किरीट सोमय्यांवरील हल्ला: पुण्यातील शिवसेना शहरप्रमुखासह 10 जणांना जामीन मंजूर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे: भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आज (8 फेब्रुवारी) त्या सर्वांना न्यायालयात हजर केले असता. त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

ADVERTISEMENT

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमधील भ्रष्टाचाराबाबत शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार देण्यास भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी आले होते. त्यानंतर पुणे महापालिकेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देखील त्याप्रकरणी निवेदन देण्यास आले होते. मात्र त्यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासोबत असलेले शिवसैनिक आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी करून महापालिकेच्या प्रवेशद्वारावरूनच सोमय्यांना हुसकावून लावलं.

यावेळी शिवसैनिकांनी सोमय्यांना धक्काबुक्की देखील केली या सगळ्या झटापटीत सोमय्या हे पायऱ्यांवरुन खाली पडले. यामध्ये किरीट सोमय्या यांना मुक्कामार देखील लागला आहे. त्यानंतर किरीट सोमय्या हे उपचारासाठी संचेती रूग्णालयात दाखल झाले आणि उपचार घेऊन दुसर्‍या दिवशी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र तरी देखील ते महापालिकेत गेले. मात्र त्यावेळी महापालिकेमधील अधिकारी नव्हते. मग त्यांनी आपलं निवदेन तेथील सुरक्षारक्षकांना दिलं आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते.

हे वाचलं का?

दरम्यान, ही घटना घडल्यापासून शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. या प्रकरणी शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह 11 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या सर्वांचा शोध सुरू असताना. काल नाना पेठेतून सनी गवते याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. पण त्याला जामीन मंजूर झाला.

त्यानंतर आज संजय मोरे यांच्यासह आज 10 जण पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले आणि या सगळ्यांना न्यायालयामध्ये हजर करण्यात आले. पण या सर्वांना देखील जमीन मंजूर झाला.

ADVERTISEMENT

पुणे महापालिकेत शिवसैनिकांकडून किरीट सोमय्यांना धक्काबुक्की, पायऱ्यांवर कोसळले सोमय्या

ADVERTISEMENT

शिवाजीनगर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ निरीक्षक अनिता मोरे म्हणाल्या की, ‘किरीट सोमय्या यांना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी आमच्याकडे 11 व्यक्तींविरोधात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचदरम्यान काल सनी गवते याला अटक करण्यात आली होती. तर उर्वरित सर्व आरोपींना न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलं होतं.’

‘यापुढील काळात सीसीटीव्हीच्या माध्यमांतून जे आरोपी निष्पन्न होतील. त्या सर्वांवर कारवाई केली जाईल.’ असंही अनिता मोरे यावेळी म्हणाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT