बीड : दोन लाख रुपये देऊन केलं लग्न; मुलगी निघाली दोन लेकरांची आई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

-रोहिदास हातांगळे, बीड

ADVERTISEMENT

अलिकडच्या काळात फसवणुकीच्या घटना वाढल्या. त्याबद्दल वाचायला ऐकायला मिळत असतं. कधी खात्यातून पैसे काढल्याचे, तर कधी परस्पर खात्यातून पैसे काढले गेल्याचे… याच फसवणुकीच्या गुन्ह्यात आता लग्न करून पैसे-दागिने घेऊन फरार होण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशीच घटना घडली आहे बीड जिल्ह्यात. या प्रकरणी पोलिसांनी आता ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

झालं असं की, गेवराई तालुक्यातील तळणेवाडी येथील कृष्णा अशोक फरताळे या मुलाला आरोपी रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) या व्यक्तीनं औरंगाबाद येथील एका मुलीचं स्थळ आणलं होतं.

हे वाचलं का?

बीड: जिवंतपणीच पतीकडून मरणयातना! पत्नीला तब्बल चार वर्षांपासून ठेवलं डांबून, कारण…

दरम्यान नवरी मुलगी रेखा चौधरी व इतर चार जणांनी दोन लाख देत असाल, तर लग्नास तयार असल्याची अट घातली. त्यानुसार नवरीकडील मंडळींना रोख ६० हजार व १ लाख ४० हजारांचा धनादेश मुलाच्या घरच्यांनी दिला.

ADVERTISEMENT

व्यवहार झाल्यानंतर गेवराई तालुक्यातील बोरीपिंपळगाव फाट्यावरील एका मंगल कार्यालयात २० जुलै २०२१ रोजी लग्न समारंभ पार पडला. दरम्यान, दिलेला धनादेश आठ दिवसांत विड्रॉल झाल्यानंतर नवविवाहिता रेखा ही माहेरी गेली. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळी कारणं देत ती परतलीच नाही.

धक्कादायक ! पतीला डांबून गुंडाचा महिलेवर बलात्कार, पोलिसांनी भररस्त्यात काढली आरोपीची धिंड

ADVERTISEMENT

काही दिवस लोटल्यानंतर तिचा मोबाईल बंद झाला. त्याचबरोबर तिचा आधीच विवाह झाल्याचंही समोर आलं. तिचा आठ वर्षापूर्वी काकासाहेब भाऊसाहेब पठाडे या व्यक्तीशी विवाह झाला असल्याचं समोर आलं. त्यांना दोन अपत्य देखील असल्याचं मुलाच्या कुटुंबियांना कळालं, हे ऐकून त्यांना धक्काच बसला.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचं स्थळ आणणाऱ्या रामकिसन जगन्नाथ तापडिया यांना संपर्क साधला असता त्यांनी ‘तुम्हाला काय करायचे ते करा, कोठे फिर्याद द्यायची ते करा’, म्हणत फोन कट केला.

याप्रकरणी नवरदेव मुलगा कृष्णा फरताळे याच्या फिर्यादीवरून संतोष विश्वनाथ शिंदे, सुनीता बाळू चौधरी, रेखा बाळू चौधरी (तिघे रा.जाधववाडी औरंगाबाद सिडको), रामकिसन जगन्नाथ तापडिया (रा.सालवडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर) व विठ्ठल किसन पवार (रा.सावरखेडा, गंगापूर, औरंगाबाद) या पाच जणांविरुद्ध गेवराई पोलीस ठाण्यात कलम ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT