काम कोणाचं नाचतंय कोण? विकासकामांच्या श्रेयवादावरुन साताऱ्यात दोन राजेंमध्ये पोस्टरवॉर
साताऱ्यात नगरपालिका निवडणुकांच्या आधीच दोन प्रमुख नेते असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यात वाद रंगताना पहायला मिळत आहे. साताऱ्यातील विकासकामांच्या श्रेयवादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केल्यामुळे नागरिकांमध्ये या प्रकरणी जोरदार चर्चा सुरु आहे. आज उदयनराजेंनी पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्याचा शुभारंभ केला. त्यानंतर लगेच नगरविकास आघाडीकडून ज्या ठिकाणी उदयनराजे यांनी केलेल्या शुभारंभाचा बोर्ड […]
ADVERTISEMENT
साताऱ्यात नगरपालिका निवडणुकांच्या आधीच दोन प्रमुख नेते असलेल्या उदयनराजे आणि शिवेंद्र राजे यांच्यात वाद रंगताना पहायला मिळत आहे. साताऱ्यातील विकासकामांच्या श्रेयवादावरुन दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केल्यामुळे नागरिकांमध्ये या प्रकरणी जोरदार चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
आज उदयनराजेंनी पोवई नाका ते वाढे फाटा या रस्त्याचा शुभारंभ केला. त्यानंतर लगेच नगरविकास आघाडीकडून ज्या ठिकाणी उदयनराजे यांनी केलेल्या शुभारंभाचा बोर्ड लावला त्याशेजारी बोर्ड लावला आहे. यामध्ये पोवईनाका ते वाढे फाटा रस्ता आमदार शिवेंद्रराजे यांच्या प्रयत्नातून झाला असल्याचा मजकूर या बोर्डावर टाकण्यात आलेला आहे.
हे वाचलं का?
सातारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विकासकामांच्या शुभारंभाता धडाका लावला आहे. दुसऱ्या बाजूने शिवेंद्रराजेंनीही त्याला जोरदार उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी पक्षातून दोन्ही राजे भाजपमध्ये गेले असले तरीही दोघांमधले अंतर्गत वाद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रामुख्याने समोर येत आहेत.
या वादावादीमुळे आगामी निवडणुकांमध्ये साताऱ्यात दोन राजेंचे समर्थक वेगवेगळे लढणार असल्याचं स्पष्ट झालंय. काही दिवसांपूर्वीच साताऱ्यात उदयनराजे भोसलेंनी नगरपालिकेत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT