अभिनेत्री एंड्रिला शर्माचे हृदयविकाराच्या धक्काने निधन; 24 व्या वर्षीय घेतला अखेरचा श्वास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

हावडा (ANI वृत्तसंस्था) : बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्मा हिचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ती २४ वर्षांची होती. आज दुपारी १२.५९ मिनिटांनी कोलकातामधील एका खाजगी रुग्णालयात एंड्रिला शर्माने अखेरचा श्वास घेतला. ब्रेन स्ट्रोकमुळे मागील काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरु होते. तिला इंट्राक्रॅनियल हॅम्रेज झाले होते.

ADVERTISEMENT

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी एंड्रिलाला मल्टिपल कार्डिअॅक अरेस्ट आला. उपचारादरम्यान तिला सीपीआरची मदतही घेण्यात आली होती. तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले होते.

गायक अरिजित सिंगने केली होती आर्थिक मदत :

एंड्रिला शर्मा हिला १ नोव्हेंबर २०२२ रोजी ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर तिला कोलकातामधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होती. कोमा अवस्थेमध्ये असल्याने अनेक दिवस ती व्हेंटिलेटरवर होती. रुग्णालयाच्या वाढत्या बिलासाठी बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजित सिंगने तिला मदतीचा हात पुढे केला होता. रिपोर्ट्सनुसार १२ लाखांहून अधिक हॉस्पिटलचा खर्च झाला आहे.

हे वाचलं का?

दोन वेळा जिंकली होती कॅन्सरची लढाई :

एंड्रिला शर्माने यापूर्वी दोनदा कॅन्सरवर मात केली होती. दोन्हीवेळा कॅन्सरशी लढा जिंकून तिने पुनरागमनही केलं होतं. पण हृदयविकाराच्या धक्क्यामुळे तिचे निधन झाले. एंड्रिलाच्या निधनाची बातमी ऐकून तिचे चाहते आणि कॉस्टार्सना मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कोण आहे एंड्रिला शर्मा?

एंड्रिला शर्मा ही मुर्शिदाबादची आहे. तिने २००७ मध्ये ‘झूमर’ या टीव्ही शोमधून पदार्पण केले होते. यानंतर तिने जियो काथी, जिबोन ज्योति अशा अनेक शोमध्ये काम केले. एवढेच नाही तर तिने भगर सारख्या वेब सीरिजमध्येही काम केले आहे. सोशल मीडियावर तिचे खूप चाहते आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT