NCB चे अधिकारी असल्याचं भासवत खंडणीसाठी दबाव, भोजपूरी अभिनेत्रीची आत्महत्या; दोन आरोपी अटकेत
NCB (Narcotics Control Bureau) चे अधिकारी असल्याचं भासवत एका भोजपुरी अभिनेत्रीकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोन आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित अभिनेत्रीने आत्महत्या केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरज परदेशी आणि प्रविण वाळींबे अशी या आरोपींची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी पीडित अभिनेत्रीला एका पार्टीमध्ये पकडलं होतं. ही अभिनेत्री […]
ADVERTISEMENT
NCB (Narcotics Control Bureau) चे अधिकारी असल्याचं भासवत एका भोजपुरी अभिनेत्रीकडून खंडणी वसूल करणाऱ्या दोन आरोपींना ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पीडित अभिनेत्रीने आत्महत्या केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूरज परदेशी आणि प्रविण वाळींबे अशी या आरोपींची नावं आहेत.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींनी पीडित अभिनेत्रीला एका पार्टीमध्ये पकडलं होतं. ही अभिनेत्री आपल्या मित्रांसोबत हुक्का पार्टी करत असताना दोन्ही आरोपींनी तिला पकडलं. यावेळी आरोपींनी अभिनेत्रीला आम्ही NCB चे अधिकारी असल्याचं सांगत हे प्रकरण मिटवायचं असेल तर ४० लाखांची मागणी केली. यानंतर हे प्रकरण २० लाखांवर सेटल झालं.
या प्रकारानंतर पीडित अभिनेत्री नैराश्याच्या गर्तेत सापडली. ज्यामुळे २३ डिसेंबरला तिने आपल्या जोगेश्वरी येथील भाड्याच्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अभिनेत्रीसोबत हुक्का पार्टीतले दोन मित्रही या कटात सहभागी होते. या चौघांनी मिळून या अभिनेत्रीकडून पैसे वसूल करण्याचा प्लान आखला होता. पोलीस या दोन फरार आरोपींचा शोध घेत आहेत.
हे वाचलं का?
डोंबिवली: भर रस्त्यात गळ्यावर चाकू लावत बॅंक मॅनेजरला लुटलं, भुरटे चोर CCTV मध्ये कैद
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT