ठाकरेंकडून हिशोब चुकते करण्यास सुरुवात : सलग दुसऱ्या दिवशी भाजपला दिला धक्का

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजपने कंबर कसली आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीच्या आणि आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी न्यायालयातून दसरा मेळावा मिळविल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबतचे हिशोब बरोबरीत सोडविण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

नुकतेच पालघरचे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेला बसलेल्या या धक्क्यातून सावरत उद्धव ठाकरे यांनी आज भाजपला मोठा धक्का दिला. मुंबई भाजपच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्षा आणि अंधेरीच्या माजी नगरसेविका यांनी आज भाजपला राम-राम करुन शिवसेनेत प्रवेश केला. दिघे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि समर्थकांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी माजी मंत्री अनिल परब हे देखील उपस्थित होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने दिघे यांचा शिवसेना प्रवेश हा भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. तसेच हिशोबाच्या राजकारणातही दिघे यांचा पक्षप्रवेश करुन नाशिक पाठोपाठ मुंबईतही ठाकरे यांनी सगल दुसऱ्या दिवशी भाजपचा हिशोब चुकता केल्याचे बोलले जात आहे.

हे वाचलं का?

नाशिकमध्येही काढला वचपा :

दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक बंटी उर्फ प्रविण तिदमे हे एकनाथ शिंदे गटात दाखल झाले. तिदमेंच्या प्रवेशाचा आनंद शिंदे गट साजरा करीत असतानाच त्याची भरपाई शिवसेनेने चक्क शिंदे गटाचे सहकारी भाजपकडून वसुल केली. शुक्रवारी भाजपच्या माजी नगरसेविका पुनम धनगर यांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले. याशिवाय भाजपचे आणखी १२ नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT