राजन पाटलांना अभिमान वाटणारं ‘ते’ विधान भोवणार? संतप्त चित्रा वाघ पोलिसांना म्हणाल्या…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वर्धा : सोलापूरचे राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याने चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील तमाम महिलांचा विनयभंग झाला आहे. त्यांच्यावर तात्काळ कलम 354 चा गुन्हा दाखल करा, अशी मागणी भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या वर्धा इथे बोलत होत्या.

ADVERTISEMENT

राजन पाटील यांचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना अश्लाघ्य भाषेचा वापर केल्याचा ऐकू येत आहे. सोलापूरमधील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारातील हा व्हिडीओ आहे.

काय म्हणाले राजन पाटील?

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राजन पाटील यांनी एक सभेला संबोधित केलं. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, निवडणूक भीमा कारखान्याची आहे की राजन पाटील यांच्या कुटुंबाची? हेच कळायला मार्ग नाही.

हे वाचलं का?

आमच्या पोरांना बाळ म्हणतो… आरं आम्ही पाटील आहोत. याला माहितीच नाही. पाटलांच्या पोरांना लग्नाच्याही आधी तुझ्याएवढी बाळं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या पोरांना बाळं म्हणतोय, भीती घालतोय. आहो वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलम भोगणारी आमची पोरं आहेत, अशी खालच्या पातळीची टीका त्यांनी केली.

चित्रा वाघ काय म्हणाल्या?

राजन पाटील यांचं हे वादग्रस्त वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. राजन पाटील यांच्यावर पोलिसांनी 354 चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. त्या म्हणाल्या, राजन पाटील यांचं हे अतिषय संतापजनक निषेधार्थ वक्तव्य आहे. ज्या पद्धतीने त्यांनी या दर्पोक्ती केल्या आहेत या दर्पोक्ती त्यांच्या आहेत, त्यांच्या पक्षाच्या आहेत.

ADVERTISEMENT

हा वाद काही जुना नाही, महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी केल्या गेल्या. पण राष्ट्रवादीच्या या नेत्याने तर महाराष्ट्रातील सर्व महिलांची खिल्ली उडवण्याचा काम केलं आहे. त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. आता मला बघायचं आहे की महाराष्ट्रातल्या रणरागिनी ज्या गेल्या आठ दिवसांपासून गदारोळ चालला होता की महिलांचा सन्मान.

ADVERTISEMENT

आता त्यांच्या पक्षाच्या नेत्याने अशा प्रकारची वक्तव्य केलं आहे तर त्यांना तुम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही का? फोटोवर चपला हाणून आंदोलन करणार आहात का? माझे सोलापूर पोलिसांना सांगणे आहे की राजन पाटील यांच्या वक्तव्याने महाराष्ट्रातील तमाम महिलांचा विनयभंग झाला आहे. त्याच्यावर 354 चा गुन्हा तात्काळ दाखल करा, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT