Chitra Wagh : महिला आयोगाचं अध्यक्षपद हवं म्हणून ‘उर्फी’चा विषय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बीड : व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून एखादी बाई अंगावर कपडेचं घालत नाही, हे कसं चालेल? एखादी बाई फक्त तुकडे घालून रस्त्यावर फिरते हे तुम्हाला मान्य आहे का? माझा विरोध उर्फी नावाच्या व्यक्तीला नाही तर तिच्या विकृतीला आहे, असं म्हणतं भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘उर्फी जावेद‘ प्रकरणात स्पष्ट मत व्यक्त केलं. त्या बीडमध्ये बोलतं होत्या.

ADVERTISEMENT

कितीही विरोध करा… पण मी कोणाच्या बापाला घाबरतं नाही : चित्रा वाघ

यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या, किती लोक माझ्या विरोधात बोलतात? काय बोलतात? मला त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही. मला विरोध करायचा असेल त्यांनी खुशाल करा. राजकीय मुद्द्यांसाठी माझ्यावर १०० वेळा विरोध करा. मात्र उर्फीचा विषय हा राजकारणाचा नाही तरीही मला घेरलं जातं आहे. मला विरोध करणाऱ्यांना काय वाटलं की मी घाबरणारी आहे का? मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. हा नंगा नाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही असही त्यांनी ठणकावून सांगितलं.

हे वाचलं का?

आयोगाचं अध्यक्षपद हवं म्हणून ‘उर्फी’चा विषय?

महिला आयोगाचं अध्यक्षपद हवं असल्याने चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत, या होणाऱ्या टिकेवर बोलतना चित्रा वाघ म्हणाल्या, मी समाजातलं स्वास्थ बिघडू नये म्हणून काम करते आहे. मला महिला आयोगाचं अध्यक्षपद हवंय म्हणून मी हे बोलते आहे असं कुणाला वाटत असेल तर ते दुर्दैवी आहे. उर्फीच्या विरोधात जी मी भूमिका काल घेतली होती तीच आजही आहे उद्याही असणार आहे. मी माझ्या घरासाठी या गोष्टी करत नाही.

ADVERTISEMENT

‘उर्फी जावेद’ची माहिती कशी मिळाली?

ADVERTISEMENT

‘उर्फी जावेद’ची माहिती कशी मिळाली या प्रश्नावर उत्तर देताना वाघ म्हणाल्या, महाराष्ट्रातल्या एक महिलेना, एका आईने मला ही क्लिप पाठवली. त्यावर त्यांनी काही तरी बोला, काय चाललं आहे मुंबईत असा सवाल मला विचारला. त्यामुळे मी या विषयावर बोलतं आहे. त्या आईने मला पाठवलं तेव्हा मला कळलं ही बाई कोण आहे, नाहीतर माझा काय संबंध उर्फी जावेदशी? माझ्या विरोधात बोलणाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत, असंही त्या म्हणाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT