Pune पोलिसांच्या पाठवलेल्या Look Out Notice नंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
DFHL कर्ज प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस पाठवली आहे. याबाबत नितेश राणे यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भातला एक व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाले आहेत नितेश राणे? हे सर्क्युलर पुणे पोलिसांनी काढलं […]
ADVERTISEMENT
DFHL कर्ज प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांनी लुक आऊट नोटीस पाठवली आहे. याबाबत नितेश राणे यांची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भातला एक व्हीडिओ ट्विटरवर पोस्ट करून ही प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले आहेत नितेश राणे?
हे सर्क्युलर पुणे पोलिसांनी काढलं आहे, पण आमचे DFHL चे खाते मुंबईमध्ये आहे त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने लुक आऊट नोटीस कशी काढली? आम्ही पाच महिन्यांपूर्वी बँकेला आमचं लोन सेटल करायचं आहे असं अधिकृत पत्र दिलं आहे त्यामुळे अशा नोटीसचा उपयोग नाही. या प्रकरणाला आम्ही हायकोर्टात आव्हान देणार आहोत. या नोटीसमुळे नारायण राणे कुटुंबीयांची नाही तर महाविकास आघाडीची अडचण होणार आहे.
हे वाचलं का?
ही लुक आऊट नोटीस कुणी काढली विचारा यांची झोप आम्ही उडवत आहोत. आता यांचे सगळे भ्रष्टाचाराचे विषय बाहेर निघणार आहेत त्यामुळे अडचणी आमच्या वाढणार की ठाकरे सरकारच्या हे तुम्हाला समजेलच. लुकआऊट नोटीस संदर्भात आम्ही हायकोर्टात बोलू असंही नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
तसंच सर्क्युलर आम्हाला नाही तर विमानतळ प्राधिकरणाला पाठवलं आहे त्यामुळे आम्हाला प्रवास करता येणार की नाही हे त्यांना ठरवावं लागणार आहे. आम्ही महाराष्ट्र सोडून जाणार नाही. ठाकरे सरकार महाराष्ट्र बुडवायला निघालं आहे. वर्षानुवर्षे कर भरून, अधिकृत व्यवसाय करून आम्ही राजकारण करतो यांच्यासारखे काळे धंदे आम्ही करत नाही असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
— nitesh rane (@NiteshNRane) September 9, 2021
काय आहे प्रकरण?
ADVERTISEMENT
DFHL कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलिसांकडून लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. कंपनीकडून घेतलेलं 65 कोटींचं कर्ज थकवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही नोटीस धाडली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने यासंदर्भात तक्रार नोंदवली होती.
आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रा. लिमिटेडने 25 कोटींचं कर्ज घेतलं होतं. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. या कर्जाची परतफेड न केली गेल्याने तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे नीलम हॉटेल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने DFHL कडून 40 कोटींचं कर्ज घेतलं होतं आणि त्याची देखील 34 कोटींपर्यंत थकबाकी आहे. DFHL संबंधित एजन्सीकडे या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी ही लुक आऊट नोटीस जारी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT