Narayan Rane यांच्या अटकेच्या निषेधार्थ पुण्यात भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ बालगंधर्व चौकात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. एवढंच नाही तर शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. बोल रे बोल हल्ला बोल अशा प्रकारच्या घोषणाही पुण्यातल्या बालगंधर्व चौकात देण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. त्यानंतर नारायण राणे यांना गोळवली येथून ताब्यात घेण्यात आलं आणि नंतर अटक करण्यात आली. त्याचेच पडसाद आज दिवसभर उमटले. शिवसेना विरूद्ध भाजप असा सामना दिवसभर पाहण्यास मिळाला.

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्यांवरुन टीका केली. सुरुवातीला नारायण राणेंनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन यावरुन बरीच मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली.

‘या माणसाकडे कोणातीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.’ असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.

ADVERTISEMENT

त्यानंतर पुढे ते असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही.

ADVERTISEMENT

15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT