Mumbai Budget 2022 : 46 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर, वाचा काय आहेत तरतुदी?
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा परिणाम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर झाल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसून आलं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण, डिजिटल शिक्षण या सगळ्यावर भर देण्यात आला. ही शिक्षण प्रणाली बळकट करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा […]
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. शिक्षण विभाग, आरोग्य विभाग यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा परिणाम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्थेवर झाल्याचं मोठ्या प्रमाणावर दिसून आलं. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण, डिजिटल शिक्षण या सगळ्यावर भर देण्यात आला. ही शिक्षण प्रणाली बळकट करण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठीच्या दृष्टीने अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
ADVERTISEMENT
पावसाळ्यात मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठतं. मुंबईची तुंबई होते. जनजीवन विस्कळीत होतं. मुंबईच्या लोकल सेवेवरही परिणाम होतो. ज्याचा मनस्ताप नोकरदार वर्गाला सनह करावा लागतो. या पार्श्वभूमीवर काही तरतुदी बजेटमध्ये करण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिकेने 565.36 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
आणखी काय काय तरतुदी करण्यात आल्या आहेत?
हे वाचलं का?
मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प
3 हजार 200 कोटींची तरतूद
ADVERTISEMENT
गोरेगाव मुलुंड लिंक रोड
ADVERTISEMENT
1 हजार 300 कोटींची तरतूद
घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प-कचऱ्यापासून वीज निर्मिती
167 कोटींची तरतूद
मुंबई मलनिःसारण प्रकल्प
1 हजार 340 कोटी
जलवहन बोगदे
467 कोटींची तरतूद
सायकल ट्रॅक
45 कोटींची तरतूद
मोठ्या जलवाहिन्यांची कामं
210 कोटींची तरतूद
मिठी नदी प्रकल्पाचं काम
565 कोटींची तरतूद
सिद्धार्थ रूग्णालयाचा पुनर्विकास
25 कोटींची तरतूद
शिरोडकर मंडईचा पुनर्विकास
20 कोटींची तरतूद
क्रांतीवीर महात्मा फुले मंडई टप्पा 2
40 कोटींची तरतूद
नायर रूग्णालय
40 कोटींची तरतूद
सायन कोळीवाडा वसतिगृह
45 कोटींची तरतूद
टोपीवाला मंडई
20 कोटींची तरतूद
आश्रय योजना
1300 कोटींची तरतूद
टाटा कम्पाऊंड हॉस्टेल इमारत
4 कोटींची तरतूद
मुंबई महापालिका निवडणूक याच वर्षात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज तब्बल ४६ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७ हजार कोटीनी हा आकडा मोठा असून आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा अर्थसंकल्प असल्याचं बोललं जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात इतर घोषणांसोबतच दरवर्षी सालाबादप्रमाणे मुंबईत पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूरस्थितीसाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलण्यात आल्याचं अर्थसंकल्पात नमूद करण्यात आलं आहे.
आदित्य ठाकरे काय म्हणाले?
आत्ताच महानगरपालिकेचं बजेट हे एका अत्यंत संवेदनशील, प्रगतीशील राज्याच्या राजधानीचं आहे. यात महिलांसाठी, पर्यावरणासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींची तरतूद आहे. एकंदरच मुंबईच्या प्रगतीसाठी या बजेटमध्ये तरतुदी केलेल्या आहेत. पुढे चला मुंबई हाच नारा घेऊन आता आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे. पहिल्यांदाच मुख्यमंत्री मुंबईचे असल्याने मुंबईसाठी ज्या काही चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत, ते या अर्थसंकल्पातून दिसत आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT