सोशल डिस्टन्सिंगची ऐशी-तैशी ! नियम मोडणाऱ्या दक्षिण मुंबईतील बारवर BMC ची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एकीकडे मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असताना मुंबईतील अनेक भागांमध्ये रेस्टॉरंट-पब मध्ये सर्रास नियमांचं उल्लंघन केलं जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे BMC कडून वारंवार आवाहन केलं जात असतानाही दक्षिण मुंबई भागातील पॉश वस्त्यांमधील रेस्टॉरंट आणि बारमध्ये नियमांचं उल्लंघन होताना दिसत आहे. ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळ असलेल्या अर्बरझीन रेस्टॉरंट आणि बारवर महापालिकेच्या पथकाने १८ मार्च ला रात्री एक वाजता धाड टाकत कारवाई केली आहे.

ADVERTISEMENT

या कारवाईच्या वेळी बारमध्ये सुमारे २४५ लोकं होती. ज्यात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसत होतं. यामधील बहुतांश लोकं ही मास्क न घालता वावरत होती. या सर्व लोकांकडून महापालिकेच्या पथकाने १९ हजार ४०० रुपयांचा आर्थिक दंड वसूल केला आहे. याचसोबत रेस्टॉरंट मालकाविरोधात FIR दाखल करुन हे रेस्टॉरंट पालिकेने बंद केले आहे.

दरम्यान, “मुंबईत सध्या लॉकडाउनची गरज नाहीये, रात्रीच्या संचारबंदीचीही सध्या गरज वाटत नाही. पण रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता शहरात काही निर्बंध नक्कीच लावले जाऊ शकतात. अनेक लोकं मुंबई नोकरी, उद्योगधंद्यासाठी येत असतात. अशा परिस्थितीत पुन्हा लॉकडाउन लावलं तर अर्थव्यवस्थेवर याचा गंभीर परिणाम होईल. याच कारणासाठी महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याच्या विचारात नाहीये.” अस्लम शेख मालाड येथील एका हॉस्पीटलमध्ये लसीकरण मोहीमेचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हे वाचलं का?

अहमदनगरमधील भाजपचे माजी खासदार दिलीप गांधींचं कोरोनामुळे निधन

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT