Viral Video: गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला गावकऱ्यांकडून तुफान मारहाण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला विजेच्या खांबाला बांधून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल (30 जानेवारी) रात्री मनियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा एक व्हीडिओही व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

हा व्हीडिओ पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली. मनियारी पोलीस स्टेशन हद्दीतील मारिचा गावात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. व्हायरल व्हीडिओमध्ये दिसत आहे की, गावातील लोकांनी एका तरुणाला वीजेच्या एका खांबाला बांधले आहे आणि ते त्याला सतत मारत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी तिथे आला होता. पण ही बाब जेव्हा गावकऱ्यांना समजली तेव्हा त्यांनी तरुणाला पकडून बेदम मारहाण केली. यादरम्यान तो लोकांकडे दयेची याचना करत राहिला. पण त्याची कुणालाच दया आली नाही. सर्वजण त्याला बेदम मारहाणच करत होते.

हे वाचलं का?

दोषींवर केली जाईल कडक कारवाई

व्हायरल झालेला व्हीडिओ सुमारे 2 मिनिटे 17 सेकंदांचा आहे. या व्हीडिओमध्ये मोठ्या संख्येने लोक जमा झालेले दिसून येत आहेत. त्याचवेळी अनेक लोक या तरुणाला निर्दयीपणे मारहाण करत असल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनियारीच्या एसएचओने या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ADVERTISEMENT

उपनिरीक्षक सुजित कुमार मिश्रा यांनी सांगितले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलीस कारवाई करणार आहेत आणि यामध्ये जो कोणी दोषी आढळेल त्या सर्वांवर कडक कारवाई केली जाईल.

ADVERTISEMENT

प्रेयसीने आईच्या साथीने प्रियकराला केली मारहाण

दुसरीकडे बिहारच्या हाजीपूरमध्ये एका मैत्रिणीने तिच्या प्रियकराला भर रस्त्यात बेदम चोप दिल्याचं समोर आलं आहे. यावेळी मुलीची आईही तिथं उपस्थित होती, तिनेही मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण केली तसेच त्याला प्रचंड शिवीगाळही करण्यात आली.

या सगळ्या प्रकाराबाबत प्रियकराने सांगितले की, ‘मी तिच्याशी गेल्या तीन वर्षांपासून संपर्कात होती. मात्र, आता ती दुसऱ्यासोबत व्यस्त झाली आहे. यामुळेच ती माझ्यापासून दुरावली आहे.’

अनैतिक संबंध, विवाहित प्रेयसी अन् एका हत्येचा ‘विषारी’ कट!

दरम्यान, दोन्ही बाजूंनी गोंधळ वाढताच आजूबाजूचे लोकही घटनास्थळी पोहोचले. मुलगी आणि तिची आई त्या मुलाला खूप मारत होत्या. तिथे मुलगा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. मारहाणीनंतर जमा झालेला जमाव पाहून पोलीसही घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी उपस्थित जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT