बकिंगहॅम पॅलेस चिंतेत.. ब्रिटनच्या राणीला कोरोनाची लागण!
बकिंगहॅम (ब्रिटन): ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (दुसरी) यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 95 वर्षीय एलिझाबेथ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (रविवारी) पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे. बकिंगहॅम पॅलेसने याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांची […]
ADVERTISEMENT
बकिंगहॅम (ब्रिटन): ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ (दुसरी) यांना देखील कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं नुकतंच समोर आलं आहे. 95 वर्षीय एलिझाबेथ यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (रविवारी) पॉझिटिव्ह आला आहे. याबाबतचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे. ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
बकिंगहॅम पॅलेसने याबाबत माहिती देताना सांगितलं की, ‘राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांची आज कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह चाचणी आली आहे. त्यांनी सर्दीसारखी सौम्य लक्षणे जाणवत आहेत. परंतु येत्या आठवड्यात त्या विंडसरमध्ये त्या आपली सामान्य कामं सुरू ठेवतील.’
बकिंगहॅम पॅलेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘त्यांना वैद्यकीय सहाय्य दिले जाईल आणि त्या सर्व योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील.’
हे वाचलं का?
इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळल्यास सध्याच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 10 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागत आहे. मात्र, लागण झालेल्या व्यक्तीचा सातव्या आणि आठव्या दिवशी चाचणी अहवाल निगेटिव्ह आला तर ते क्वारंटाईनमधून बाहेर येऊ शकतात.
तथापि, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रविवारी सांगितले की ते सेल्फ-आयसोलेशनचे हे धोरण संपविण्याचा विचार करत आहेत आणि लसीकरणावर अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी असंही म्हटलं आहे की, , कोव्हिडसोबतच आपल्याला सामान्य पद्धतीने जीवन जगायला शिकले पाहिजे.
ADVERTISEMENT
दरम्यान, महाराणी एलिझाबेथ यांचा पुत्र आणि त्यांचा उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्स आणि त्यांची पत्नी कॅमिला पार्कर यांनाही या महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लागण झाली होती. विशेष म्हणजे ब्रिटनमध्ये आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत.
ADVERTISEMENT
डेल्टा व्हेरिएंटनंतर ओमिक्रॉन व्हेरिएंटने तेथे बराच संसर्ग पसरवला आहे. उच्च सुरक्षा असलेले लोक देखील यापासून वाचू शकलेले नाही. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती.
एक होते… Prince Philip
मागील दोन वर्षांपासून कोरोनाने अवघ्या जगभरात कहर केला आहे. अशावेळी अमेरिका, इंग्लंड, भारत, रशिया, जर्मनी यासारख्या मोठ्या देशांमध्ये देखील या व्हायरसने प्रचंड नुकसान केलं आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत जगभरात कोट्यवधी लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही हा व्हायरसवर ठोस उपचारपद्धती अस्तित्वात आलेली नाही.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT