एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंकडून पक्षप्रमुखपद हिरावून घेऊ शकतात का?, नवीन कार्यकारिणी वैध की अवैध?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात सत्ता काबीज केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेण्याची तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून नवी कार्यकारिणी तयार केली आहे. प्रश्न असा आहे की ही कार्यकारिणी कितपत कायदेशीर आहे? यातून उद्धव ठाकरेंच्या हातून पक्षाची कमान हिसकावून घेता येऊ शकते का?

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेची नवीन कार्यकारणी तयार केली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, लीलाधर डाके, दिवाकर रावते, सुधीर जोशी, संजय राव, सुभाष देसाई, रामदास कदम, गजानन कीर्तिकर, आनंद गीते, आनंदराव अडसूळ, आनंद राव, एकनाथ शिंदे यांचा समावेश होता.

सोमवारी शिंदे यांनी ही कार्यकारिणी बरखास्त करून त्यांच्यावतीने नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यात रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ यांची पुन्हा नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यशवंत जाधव, गुलाबराव पाटील, उदय सामंत, तानाजी सावंत, शिवाजीराव पाटील, विजय नाहाटा आणि शरद पोंक्षे यांची उपनेतेपदी, तर दीपक केसरकर यांची नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

शिवसेनेच्या नव्या कार्यकारिणीतून शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यांची नियुक्ती केल्याचे स्पष्ट झाले आहे. जुन्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून केवळ दोनच नेत्यांना घेतले असून, ते उद्धव ठाकरेंना सोडून सोमवारी एकनाथ शिंदे गटात सामिल झाले आहेत.

नवीन कार्यकारिणी कितपत वैध?

शिंदे यांनी स्थापन केलेल्या कार्यकारिणीची वैधता कितपत आहे?, हा प्रश्न आहे. ज्येष्ठ पत्रकार अरविंद सिंग म्हणतात की, राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा अधिकार पक्षाच्या अध्यक्षांकडे आहे. अशा स्थितीत शिंदे यांनी ज्या पद्धतीने शिवसेनेची जुनी कार्यकारिणी रद्द करून नवी कार्यकारिणी स्थापन केली आहे, त्यावरून त्याच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते. त्याला उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगात आव्हान दिले जाऊ शकते. निवडणूक आयोगही शिवसेनेच्या घटनेतील प्रत्येक बाबी तपासेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षप्रमुख पद हिरावून घेता येईल का?

एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. शिंदेंनी नवीन कार्यकारणी स्थापन केली आहे, परंतु शिवसेनेची कमान अजूनही ठाकरे कुटुंबाकडेच आहे. ते काढून घेणे पाहिजे तेवढे सोपे नाही. शिवसेनेच्या घटनेनुसार शिवसेनेच्या प्रमुखांची निवड पक्षाच्या प्रतिनिधी सभेने करायची असते. पक्षाची प्रतिनिधी सभा ही गावपातळीपासून तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरापर्यंतच्या सर्व संघटनात्मक कायदेशीर प्रक्रियेवर आधारित असते. यामध्ये खासदार-आमदारांसह पक्षाच्या अनेक विभागांचे प्रमुख असतात.

ADVERTISEMENT

2018 मध्ये शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेत 282 जणांचा समावेश होता. या सर्वांनी मिळून उद्धव ठाकरे यांची शिवसेनेच्या अध्यक्षपदी निवड केली होती. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत बदल केला असला तरी पक्षाच्या प्रमुखपदाला हात लावलेला नाही. उद्धव ठाकरे आजही शिवसेनेचे अध्यक्ष आहेत.

शिवसेनेवरती आपला दावा भक्कम असल्याचे निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासमोर दाखवून देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांकडून सुरू असल्याचे जाणकारांचे मत आहे. उद्धव ठाकरे यांनी 25 जून रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही घेतली, ज्यामध्ये सहा महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले होते.

त्यात उद्धव ठाकरे यांची सेनाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली असून त्यांना पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. माजी मंत्री विजय शिवतारे आणि हिंगोली जिल्हाध्यक्ष आमदार संतोष बांगर, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, जे सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल झाले आहेत अशा स्थितीत या खेळात कोणाचा पराभव होतो आणि शिवसेनेची कमान कोणाच्या हाती राहते हे पाहावे लागणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT