एक मनीमाऊ जेव्हा संपूर्ण शहराची बत्ती गूल करते…वाचा काय आहे हे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुण्यातील भोसरी, आकुर्डी या भागांमध्ये बुधवारी बत्ती गूल झाल्यामुळे सामान्य नागरिकांना चांगलाच फटका बसला. एकीकडे उन्हाळ्यामुळे वाढणारं तापमान आणि त्यात लाईट गेल्यामुळे झालेली अंगाची लाही यामुळे नागरिकांना चांगलाच त्रास सहन करावा लागला. पुण्यात अचानकपणे बत्ती गूल होण्याचं कारण आता समोर आलं आहे. कोणत्याही तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला नसून एका मांजरीमुळे भोसरी, आकुर्डी भागात वीज गेल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

महापारेषणच्या उपकेंद्रात बिघाड झाल्याने पुण्याच्या भोसरी आणि आकुर्डीत बत्ती गुल झाली होती. जवळपास ६० हजार ग्राहकांना याचा फटका बसला होता. पहाटे सहा वाजल्यापासून ते संध्याकाळपर्यंत या भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता.

महापारेषणच्या भोसरी उपकेंद्रात एका मांजर सकाळी सहाच्या सुमारास २२ के. व्ही.च्या यार्डमधील चालू वीज उपकरणावर चढल्यामुळे हा बिघाड झाला होता. यात विजेचा धक्का लागल्यामुळे मांजरीचा जीव गेला, परंतू यामुळे पुणेकरांनाही याचा फटका बसल्याचं कळतंय.

हे वाचलं का?

दरम्यान हा प्रकार लक्षात येताच महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी के. व्ही. उपकेंद्रातील ७५ एम.व्ही.ए. क्षमतेच्या विद्युत रोहित्रावर वीजपुरवठा सुरळीत केला. याशिवाय उर्वरित वीजपुरवठा हा २२० के. व्ही. भोसरी-२ उपकेंद्रातून सुरळीत करण्यात आला. परंतू हा बिघाड दुरुस्त करण्यात संध्याकाळ उलटल्यामुळे पुणेकरांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेमुळे बुधवारी भोसरी, आकुर्डी भागातील कंपन्यांनाही फटका सहन करावा लागला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT