Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेला सुशील कुमार ते पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेला सुशील कुमार….गेल्या काही दिवसांमध्ये सुशील कुमारचं एक वेगळंच रुप सर्व देशाला पहायला मिळालं. कुस्तीच्या आखाड्यात आपल्या प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देत सुशीलने अनेकदा भारताची मान उंचावली. परंतू नेमकं असं काय झालं की सुशीलवर सध्या इतका गंभीर आरोप लागला आहे? ४ […]
ADVERTISEMENT
ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून कोट्यवधी भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनलेला सुशील कुमार ते पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणात आरोपी असलेला सुशील कुमार….गेल्या काही दिवसांमध्ये सुशील कुमारचं एक वेगळंच रुप सर्व देशाला पहायला मिळालं. कुस्तीच्या आखाड्यात आपल्या प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देत सुशीलने अनेकदा भारताची मान उंचावली. परंतू नेमकं असं काय झालं की सुशीलवर सध्या इतका गंभीर आरोप लागला आहे?
ADVERTISEMENT
४ मे रोजी दिल्लीच्या छत्रसाल स्टेडीयममध्ये झालेल्या मारहाणीत सुशील आणि त्याच्या काही सहकाऱ्यांनी सागर राणा इतर मल्लांना मारहाण केली. ज्यात काही मल्ल जखमी झाले. सागर राणाचा दिल्लीतील हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुशील आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात FIR दाखल केला. यानंतर फरार असलेला सुशील अखेरीस दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. जाणून घ्या, आतापर्यंत काय काय घडलंय या प्रकरणात?
ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अखेरीस अटकेत
हे वाचलं का?
४ मे – ग्रेको रोमन प्रकारात कुस्ती खेळणारा पैलवान सागर राणा आणि त्याच्या काही मित्रांना छत्रसाल स्टेडीयममध्ये सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांशी वाद झाला. सागर आणि त्याचे मित्र सोनू महल आणि अमित कुमार यांना सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या सागर, अमित आणि सोनू यांच्यावर दिल्लीतील BJRM हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले.
दिल्ली पोलिसांनी जखमी झालेल्या सागर, अमित आणि सोनूचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं ज्यात त्यांनी सुशील आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचं सांगितलं.
ADVERTISEMENT
६ मे – सागर राणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ६ मे रोजी सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात FIR दाखल केला. दिल्ली पोलिसांनी सुशीलच्या दिल्लीती ठिकाणांवर छापेमारी केली परंतू तोपर्यंत त्याने दिल्ली सोडलेली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ६ मे ला दिल्ली सोडल्यानंतर सुशील कुमार पहिल्यांदा हरिद्वारला गेला, ज्यानंतर तो ऋषिकेशमध्ये एका मोठ्या अध्यात्मिक बाबाच्या आश्रमात होता.
ADVERTISEMENT
९ मे – सुशील कुमारविरोधात दिल्ली पोलिसांची Lookout नोटीस जाहीर…सुशील कुमार फरार झाल्याचं पोलिसांनी जाहीर केलं. दरम्यानच्या काळात सुशील कुमार वारंवार आपली ठिकाणं बदलत पोलिसांना गोंधळात पाडण्याचा प्रयत्न करत होता. या काळात तो दिल्ली, चंदीगढ, हरियाणा यासारख्या भागांत तो वारंवार आपली जागा बदलत होता.
मध्यंतरीच्या काळात भारतीय कुस्ती महासंघानेही याप्रकरणात आपली प्रतिक्रीया देत झालेल्या प्रकारामुळे भारतीय कुस्ती क्षेत्रावर मोठा डाग बसल्याचं सांगितलं. परंतू मॅटबाहेर पैलवानांमध्ये जे काही झालं त्याचा कुस्ती महासंघाशी काहीही संबंध नसल्याचं म्हणत कुस्ती महासंघाने आपले हात वर केले.
१५ मे – दिल्ली कोर्टाने सुशील कुमार आणि त्याच्यासोबत फरार झालेल्या आरोपीविरोधात अजामिनपात्र वॉरंट जाहीर केलं. वारंवार छापेमारी करुनही सुशील हातात येत नसल्यामुळे दिल्ली पोलिसांनी कोर्टात जात त्याच्याविरोधात वॉरंट जाहीर करवुन घेतलं, ज्यामुळे सुशीलच्या अडचणींमध्ये आणखीनच वाढ झाली.
१७ मे – सुशील कुमारची माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी १ लाखाचं बक्षीस जाहीर केलं.
१८ मे – दिल्लीच्या रोहिणी कोर्टात सुशील कुमारचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. आपल्यावरील सर्व आरोप एकांगी असून आपलं नाव खराब करण्यासाठी हे आरोप करण्यात आल्याचं सुशीलने आपल्या वकीलांकरवी कोर्टासमोर सांगितलं. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर रोहिणी कोर्टाने सुशीलचा अटकपूर्व जामिन फेटाळला.
२३ मे – आपल्या सहकाऱ्यासोबत स्कुटरवरुन कोणालातरी भेटायला जात असताना सुशील कुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे पुढील तपासात नेमक्या काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT