कोल्हापुरात CM Thackeray आणि Devendra Fadnavis आले समोरासमोर, रस्त्यातच थांबून केली चर्चा!
कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज (30 जुलै) कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात अचानक समोरासमोर आले. यामुळे भर रस्त्यात थांबूनच दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत चर्चा केली. कोल्हापूरमधील पुराने जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी मुख्यमंत्री स्वत: कोल्हपुरात पाहणी दौरा करण्यासाठी आले आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र […]
ADVERTISEMENT

कोल्हापूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते आज (30 जुलै) कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात अचानक समोरासमोर आले. यामुळे भर रस्त्यात थांबूनच दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी कोल्हापूरच्या पूर परिस्थितीबाबत चर्चा केली. कोल्हापूरमधील पुराने जिल्ह्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. अशावेळी मुख्यमंत्री स्वत: कोल्हपुरात पाहणी दौरा करण्यासाठी आले आहेत.
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील दोन दिवसांपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. अशातच हे दोन्ही दिग्गज कोल्हापूरमध्ये एकमेकांच्या समोर आल्याने आता याविषयी बरीच चर्चा सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्याची पाहणी केली आणि त्यानंतर ते कोल्हापुरच्या शहरी भागात पाहणी करण्यासाठी वळाले. याचवेळी शाहपुरी भागात देवेंद्र फडणवीस हे देखील पूरग्रस्तांशी संवाद साधत होते. फडणवीसांचा सगळा ताफा इथे असताना त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील ताफा इथे आला. त्यामुळे या संपूर्ण परिसरात बरीच वर्दळ पाहायला मिळाली.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना रस्त्यात थांबवून त्यांच्याशी काही मिनिटं चर्चा देखील केली. फडणवीस हे पूरपरिस्थिती जाणून घेत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्याचविषयी त्यांच्या संवाद साधला असण्याचा शक्यता आहे.









