Udayanraje Bhosale: मुख्यमंत्री ठाकरेंची PM मोदींशी भेट म्हणजे राजकीय तडजोडच, परत सत्तांतर होणार: उदयनराजे

इम्तियाज मुजावर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सातारा: ‘पंतप्रधान मोदींना (PM Modi) भेटायला जाण्याआधी राज्य सरकारने चर्चा करून अधिवेशन बोलावणे गरजेचे होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान मोदींची भेट राजकीय तडजोडी साठीच घेतली असून या भेटीतून घेवाण-देवाण होणार आणि नंतर सत्तांतर होणार.’ अशी प्रतिक्रिया देत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आजच्या पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीबाबत वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

पाहा मुख्यमंत्री ठाकरे आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीबाबत उदयनराजे भोसले नेमकं काय म्हणाले?

‘आरक्षणाबाबत आपण श्वेतपत्रिकेची मागणी केली होती. अद्यापही त्याबाबत त्यांनी काहीही केलेलं नाही. मोदीजींना भेटण्यासाठी जाण्याआधी तुम्ही एक अधिवेशन बोलवा, त्यात चर्चा करा आणि मग भेटायला जा. कधीही जा…’

हे वाचलं का?

‘आता हे जाऊन भेटणार आणि काय बोलणार.. राजकीय तडजोड, म्हणजे काय ठीक आहे आम्ही हे-हे करतो आणि आपण असं-असं एकत्र येऊयात. म्हणजे परत सत्तांतर होणार. म्हणजे काय देवाण-घेवाणच होणार ना.. असंच काही तरी होणार ना?’

‘आता एवढं सगळं सुरु आहे संपूर्ण महाराष्ट्रात. कोण या मजल्यावरुन पडतंय तर कोणाच्या गाडीत काय सापडतंय.. आपल्याला माहित असतं ना काही तरी होईल. ठीक हे आम्ही हे असं करतो आपण एकत्र येऊयात आपलं लग्न पुन्हा लावूयात आणि समाजाला शांत करुयात.’

ADVERTISEMENT

Uddhav Thackeray आणि मोदी भेटतात तेव्हा चर्चा तर होणारच – संजय राऊत

ADVERTISEMENT

‘खरं म्हणजे या आरक्षणामुळे लोकांच्या मनात आग पेटली आहे. काय बोलणार याला. या लोकांनी समाजाची मानसिक अवस्था अशी करुन ठेवली आहे की. नेमकं दार आहे की खिडकी असं झालं आहे. कोणी आत येतंय तर कोणी बाहेर पडतंय. एक डाव भुताचा असं चाललंय.’ अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.

याचा अर्थ स्पष्टच आहे आणि उदयनराजे भोसले यांच्या रोख त्याच दिशेने आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची भेट ही फक्त राजकीय तडजोडीसाठीच घेतली आहे. दरम्यान, उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे आता राज्यात मात्र नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. (cm thackerays meeting with pm modi is a political compromise change of power will happen again said udayanraje)

Pm मोदींच्या भेटीनंतर भाजप शिवसेनेत जवळीक वाढेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीवर देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

दुसरीकडे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भेट याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेत जवळीक वाढेल का? असा प्रश्न विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीस म्हणाले की, ‘राजकारणात जर-तर च्या प्रश्नांना काही अर्थ नसतो. आज घडीला ते सत्तेत आहेत आणि आम्ही विरोधात आहोत ही वस्तुस्थिती आहे.’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली असं मी देखील ऐकलं. तसंच उद्धव ठाकरे यांनी जे म्हटलं आहे की आमच्यात चांगले संबंध आहेत ही बाब सकारात्मक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आमच्या भूमिका बदलल्या आहेत मात्र वैयक्तिक पातळीवर स्नेह असण्यात गैर काय?’ असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT