Lockdown ची शक्यता अद्यापही टळलेली नाही-उद्धव ठाकरे
येत्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाची परिस्थिती राज्यात अशीच राहिली तर आपल्याकडे असलेली आरोग्य व्यवस्था ही आपल्या अपुरी पडू लागते. गुरूवारी आपण एका दिवसात ३ लाख लोकांना लसीकरण केलं. महाराष्ट्र लसीकरणात नंबर वन आहे. लसींचा पुरवठा आणखी वाढवला पाहिजे. केंद्राकडे तशी मागणी केली आहे.. केंद्राकडून आपल्या लसींचा पुरवठाही केला जातो आहे. मात्र लॉकडाऊनची भीती टळलेली नाही हे […]
ADVERTISEMENT
येत्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाची परिस्थिती राज्यात अशीच राहिली तर आपल्याकडे असलेली आरोग्य व्यवस्था ही आपल्या अपुरी पडू लागते. गुरूवारी आपण एका दिवसात ३ लाख लोकांना लसीकरण केलं. महाराष्ट्र लसीकरणात नंबर वन आहे. लसींचा पुरवठा आणखी वाढवला पाहिजे. केंद्राकडे तशी मागणी केली आहे.. केंद्राकडून आपल्या लसींचा पुरवठाही केला जातो आहे. मात्र लॉकडाऊनची भीती टळलेली नाही हे कुणीही विसरू नये असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
कोरोना गेल्यावर्षी याच सगळ्या कालावधीत आला होता. त्यामुळे लॉकडाऊन करावा लागला होता. आपण सगळ्यांनी मधल्या काळात आपण काहीसे शिथील झालो. ते होता कामा नये हे लक्षात घ्या. इतर देशांचा अंदाज घेतला तर अमेरिकेनेही सात कलमी कार्यक्रम जाहीर केला. कोरोनामध्ये कुणीही राजकारण आणू नये अशी विनंती मी सगळ्यांना करतो आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
‘या’ एका कारणामुळे पुण्यावर ओढावली ‘मिनी लॉकडाऊन’ची वेळ!
हे वाचलं का?
कोव्हिडची साथ जेव्हा सुरू झाली तेव्हा आपल्याला पूर्ण माहित आहे की चाचण्याचं प्रमाण आपण वाढवत नेलं. येत्या काही दिवसांमध्ये अडीच लाख चाचण्या आपण दररोज करण्याचं आपलं उद्दीष्ट आहे. ७० टक्के चाचण्या या RTPCR असणार आहेत. केंद्राचा जो आग्रह आहे त्या प्रमाणेही आपण राज्यात चाचण्या करणार आहोत, आत्ताही तशाच पद्धतीनेही चाचण्या करतो आहोत असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
लॉकडाऊन हा खूप घातक आहे.. लॉकडाऊन केला तर अर्थचक्र थांबतं आहे. अर्थचक्र सुरू ठेवलं तर जीवाचा धोका वाढतोय अशा काहीशा विचित्र कात्रीत आपण सध्या सापडलो आहोत.
ADVERTISEMENT
Lockdown: पुण्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी, आणखी कठोर निर्बंधही लागू
ADVERTISEMENT
आपण कुठेही दर्जाशी तडजोड करणार नाही. आपण कोरोनाच्याबाबतीत काहीही लपवलेली नाही. महाराष्ट्रातील परिस्थिती धक्कादायक आहे.. मात्र घाबरून जाऊ नका. महाराष्ट्रातली सत्य परिस्थिती आपण जनतेसमोर आणतो आहोत. इतर राज्यांची उदाहरणं मला दिली जात आहेत.. त्यावर मी पुन्हा एकदा सांगेन की मला व्हिलन ठरवलं तरीही चालेल पण मी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचेच घेणार आहे. लॉकडाऊनचा उपयोग हा संसर्ग थांबवण्यासाठी आहे.. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आपण मुंबईपुरतं बोलायचं झालं तर ती संख्या ३०० ते ३५० आढळत होते. आता ती संख्या महिना-दोन महिन्यात ही संख्या एकट्या मुंबईत ८ हजारांच्यावर होती. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार मागील दोन महिन्यात झपाट्याने झाला असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT