शशी थरूर विदर्भ दौऱ्यावर; महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करून प्रचाराला करणार सुरुवात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विदर्भातील काँग्रेस नेत्यांचं समर्थन मिळवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर आज (शनिवारी) आणि उद्या विदर्भ दौऱ्यावर असणार आहेत. सुरुवातीला नागपुरातील दीक्षाभूमी येथून प्रचाराला सुरुवात करणार असल्याचं सांगितलं जातंय. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे महात्मा गांधी यांना अभिवादन करणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि शशी थरूर यांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहे. निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शशी थरूर हे दोन दिवसाच्या विदर्भ दौऱ्यावर येत आहेत.

ADVERTISEMENT

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करणार प्रचाराची सुरुवात

शनिवारी संध्याकाळी पाच वाजता शशी थरूर यांचे नागपूर विमानतळावर आगमन होणार असून त्यानंतर ते थेट दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आपल्या प्रचाराची सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते नागपुरात प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. यादरम्यान ते काय भूमिका मांडतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद गांधी घराण्याकडे आहे. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम

शशी थरूर यांचा 2 ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे बापू कुटी येतील महात्मा गांधी जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम आहे. वर्धा जिल्ह्यातील कार्यक्रम झाल्यानंतर शशी थरूर नागपुरातील प्रेस क्लब येथे विदर्भातील काँग्रेसच्या नेत्यांच समर्थन मिळवण्यासाठी एक बैठक घेणार आहेत. शशी थरूर यांच्या समर्थनासाठी आयोजित बैठकीला विदर्भातील कोणते काँग्रेस नेते उपस्थित राहतात, कोण गैरहजर राहतात, हे बघणं सुद्धा महत्वाचं असणार आहे.

हे वाचलं का?

काँग्रेस नेते आशिष देशमुखांनी आयोजित केला दौरा

वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते डॉ आशिष देशमुख यांनी शशी थरूर यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे आशिष देशमुख यांनी प्रदेश महासचिव पदाचा राजीनामा दिला होता. आशिष देशमुख यांना विरोध करणारा एक मोठा गट नागपुरात काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. त्यामुळे आशिष देशमुख यांच्या माध्यमातून शशी थरूर हे विदर्भातील काँग्रेस नेत्यांचं मत आपल्याकडे खेचण्यासाठी किती यशस्वी होतात हे येणारा काळच ठरवेल.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT