मुंबई-पुण्यापेक्षा उच्चांकी संख्येने साताऱ्यात Corona चा कहर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई-पुण्यात प्रचंड लोकसंख्या आहे मात्र गेल्या काही दिवसापासून तेथील बाधित वाढीचा वेग मंदावला आहे. अख्ख्या पुणे जिल्ह्यात रविवार 59 बाधितांचा बळी गेला आहे. मात्र हीच संख्या सातारा जिल्ह्यासाठी रविवारी उच्चांकी ठरलीय. जिल्ह्यात दररोज दोन हजारांच्या पटीत वाढत असलेली बाधितांची वाढ कमी होईना उलट मृत्यू दरात वाढ होत आहे. एकीकडे पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात वेग मंदावत असताना सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाने निर्माण केलेली स्थिती सावरण्याचा आव्हान नागरिकांसह प्रशासनासमोर आहे.

ADVERTISEMENT

चिंताजनक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात 18 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

सर्वच तालुक्यांमध्ये कोरोनाचा कहर

हे वाचलं का?

सातारा शहर व तालुका हॉटस्पॉट ठरला आहे तर गेल्या संसर्गात हॉटस्पॉट ठरलेला कराड तालुका ही पुन्हा त्याच मार्गावर असताना फलटण, कोरेगाव, खटाव, माण, खंडाळा, वाई, जावली या तालुक्यामध्ये तीन अंकी संख्येने वाढ सुरू असून तिथे मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या दोन तीन दिवसात फक्त पाटण आणि महाबळेश्वर मध्ये दोन अंकी संख्येने वाढ सुरू आहे हा वेग मंदावला असला तरी कमी झालेला नाही. सातारा कराडमध्ये कोरोना बळींचे प्रमाण जास्तच आहे.

महाराष्ट्रात Corona मृत्यूदर घटला आहे… पण मृत्यू नाही.. हे आहे कारण

ADVERTISEMENT

रविवारी रात्री अहवालात 2,280 बाधित

ADVERTISEMENT

एप्रिल महिन्याच्या एंडिंगला 30 रोजी एकूण वर्षातील 2,494 एवढी उच्चांकी बाधित वाढ नोंदवली गेली. 1 मे त्यादिवशी थोडीशी कमी पण 2,383 उच्चांकी वाढीने मे महिन्याचा आरंभ झाला आहे. तर गेल्या रविवारी रात्रीच्या अहवालात बाधित वाढीने नवा उच्चांक नोंदवला. तब्बल 2,502 जणांचे अहवाल बाधित आल्याने आता स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. तेव्हापासून सातत्याने बाधित वाढीचा हा उच्चांक मोडला गेला नसला तरी दोन हजारांच्या पटीत सुरू असलेले बाधित वाढ जिल्हावासीयांना छळत आहे. रविवारी रात्रीच्या अहवालात देखील 2,280 एवढ्या संख्येने बाधित समोर आले आहेत. बाधित वाढ आणि वाढता मृत्यूदर रोखायचा कसा यावर आता काम करावे लागणार आहे.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात कारभार

जिल्ह्यात होत असलेली बाधित वाढ थांबत नसल्याने १० मे पर्यंत केलेला कडक लॉकडाऊन पुन्हा 15 तारखेपर्यंत प्रभारी जिल्हा दंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी वाढवला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह सध्या जिल्ह्यात नाहीत. मात्र प्रशासनाकडून बाधित वाढत असल्याने एकीकडे हॉस्पिटल वाढवण्याचे काम सुरू आहे. उपाय योजना सुरू आहेत. तपासणीही वाढविण्यात आलेले आहेत. तरी देखील जिल्ह्यातील बाधित वाढ, वाढता मृत्यू दर थांबलेला नाही हे नेमके कशामुळे आणि त्यावर काय उपाय करायचे याचा प्रशासनाला आरोग्य विभागाला विचार करावा लागणार आहे.

Corona मुक्त झाल्यानंतर टूथब्रश बदललाच पाहिजे, का? जाणून घ्या

पॉझिटिव्हिटी रेट 35.97 टक्के

मागील दोन-तीन दिवसातील उच्चांकी आकडेवारी नंतर रविवारी रात्रीच्या अहवालात 2,280 जणांचा अहवाल बाधित आला आहे. या अहवालानुसार एकूण 6 हजार 339 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2,280 जणांचा अहवाल बाधित आलेला असून पॉझिटिव्हिटी रेट 35.97असा आहे.

बाधित वाढीचा वेग मंदावणार कसा ?

जिल्ह्यात 2 हजारांच्या संख्येने सुरू असलेली बाधित वाढ चिंताजनक ठरू लागली आहे. बाधित वाढीतील उच्चांक, कोरोना बळीच्या आकड्यांमध्ये उच्चांक परिस्थितीचे गांभीर्य वाढवू लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्याला सावरण्यासाठी उपाय योजना वाढवून संसर्ग रोखण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा हे निश्चितच. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये लोक स्वतः पुढाकार घेऊन संसर्ग वाढ रोखण्यासाठी प्रयत्न करू लागलेत त्यासाठी अनेक ठिकाणी जनता कर्फ्यू, पूर्ण संचारबंदी लोक स्वयंस्फूर्तीने पाळू लागले आहेत. तरीदेखील वाढणारे बाधितांचे काकडी बुचकळ्यात टाकत आहेत.

रविवारपर्यंत जिल्हय़ात

एकूण नमुने 5,99,158

एकूण बाधित 1,23,301

एकूण कोरोनामुक्त 97,586

एकूण बळी 2,574

एकूण उपचारार्थ 22,815

रविवारी जिल्हय़ात

बाधित 2,334

कोरोनामुक्त 1,516

मृत्यू 59

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT