Omicron : भारतात जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान कोरोनाची तिसरी लाट, ‘या’ प्रोफेसरचा दावा
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आपला परिणाम दाखवण्यास सुरूवात केली आहे असं अजून म्हणता येणार नाही तरीही एका आयआयटी प्रोफेसरने केलेला दावा हा टेन्शन वाढवणारा आहे. कानपूर आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागात प्रोफेसर म्हणून काम करणारे मणिंदर अग्रवाल यांना केलेला दावा आपलं टेन्शन वाढवणारा आहे. मणिंदर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंट हा वेगाने […]
ADVERTISEMENT
कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनने आपला परिणाम दाखवण्यास सुरूवात केली आहे असं अजून म्हणता येणार नाही तरीही एका आयआयटी प्रोफेसरने केलेला दावा हा टेन्शन वाढवणारा आहे. कानपूर आयआयटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग विभागात प्रोफेसर म्हणून काम करणारे मणिंदर अग्रवाल यांना केलेला दावा आपलं टेन्शन वाढवणारा आहे. मणिंदर अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमिक्रॉन व्हेरिएंट हा वेगाने पसरतो आहे मात्र तो फार घातक नाही. हर्ड इम्युनिटीमुळे या व्हेरिएंटला बायपास करण्याची शक्यता कमी आहे. मात्र त्याचा प्रसार होण्याची लक्षणं जातं आहेत. हा व्हेरिएंट साऊथ अफ्रिकेतून जगात पसरतो आहे. त्यामुळे आपण त्याकडे गांभीर्याने पाहिलं आहे.
ADVERTISEMENT
आपल्या देशात कोरोनाची तिसरी लाट जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात येऊ शकते असा दावा आता प्रोफेसर मणिंदर यांनी केला आहे. आयआयटी प्रोफेसरच्या या संशोधनानुसार भारतात 80 टक्के लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकार शक्ती विकसित झाली आहे. अशात जर तिसरी लाट आली तरीही त्याचा परिणाम दुसऱ्या लाटेसारखा म्हणजेच डेल्टा व्हेरिएंटप्रमाणे होणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. याआधी दुसऱ्या लाटेच्या वेळी आयआयटीचे प्रो. अग्रवाल यांनी डेल्टाबाबत एक रिसर्च लागू केला होता. त्यामध्ये व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला होता.
कोरोनाचा हा व्हेरिएंट आत्तापर्यंत तीस देशांमध्ये पसरला आहे. भारतातल्या कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे चार रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांमधली लक्षणं सौम्य स्वरूपाची आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. मात्र अशात आय आयटी प्रोफेसरने केलेल्या दाव्यामुळे टेन्शन वाढलं आहे.
हे वाचलं का?
Omicron Variant: अखेर भारतातही झाली ओमिक्रॉन व्हेरिएंटची एंट्री, ‘या’ राज्यात सापडले 2 पॉझिटिव्ह
ओमिक्रॉन व्हेरिएंट का धोकादायक मानला जातोय?
ADVERTISEMENT
NGS-SA ने नव्या व्हेरिएंटच्या म्युटेशनबद्दल सांगितलं की ‘B.1.1.529 म्युटेशनची जिनोम सिक्वेन्स (जनुकीय रचना) खूप दुर्मिळ आहे. 30 म्युटेशन व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये आहेत. स्पाईक प्रोटीन हा असा भाग असतो, जिथे लस परिणामकारक ठरते. त्याचबरोबर स्पाईक प्रोटीनद्वारेच व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करून शरीरातील पेशी संक्रमित करण्यास सुरूवात करतो.
ADVERTISEMENT
यात काही म्युटेशन आधीपासूनच असल्याचं आढळून आलं आहे. ज्यात अल्फा आणि डेल्टाचे म्युटेशनचा समावेश आहे. आतापर्यंत क्वचित असं आढळून आलं आहे, असंही NGS-SA ने या ओमिक्रॉनच्या व्हेरिएंटबद्दल म्हटलं आहे. व्हायरस प्रभावित करण्याची क्षमता आणि लसीचा प्रभाव याबद्दलचा अभ्यास केला जात असल्याचं आफ्रिकेतील साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सेंटर फॉर डिजिज कंट्रोल) म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT