प्रेमी युगुलाची शेतात विष पिऊन आत्महत्या, नागपूरमधल्या नरखेडमधली घटना
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर घरातून पळून जाऊन एका शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूरमधल्या नरखेडमध्ये समोर आली आहे. सुरज वगारे (वय 18) आणि रसिका गायकवाड (वय-16) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघंही नरखेड तालुक्यातील रहिवासी होते. या दोघांचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र वय कमी असल्याने लग्न करणं या दोघांना शक्य […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
घरातून पळून जाऊन एका शेतामध्ये विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूरमधल्या नरखेडमध्ये समोर आली आहे. सुरज वगारे (वय 18) आणि रसिका गायकवाड (वय-16) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावं आहेत. हे दोघंही नरखेड तालुक्यातील रहिवासी होते.
या दोघांचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र वय कमी असल्याने लग्न करणं या दोघांना शक्य नव्हतं. त्यामुळे नैराश्यातून त्यांनी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
हे वाचलं का?
बुलढाणा : गळफास घेताना सेल्फी घेत विवाहीतेची आत्महत्या, पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रसिका ही तिच्या मामाच्या घरी राहत होती. शुक्रवारी दोघे घरातून पळून गेल्यानंतर रसिकाच्या मामाने नरखेड तालुक्यातील जलालखेडा पोलीस स्थानकात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली त्यानुसार पोलिसांनी कलम 363 गुन्हा दाखल करून तपस सुरू केला होता.
ADVERTISEMENT
धक्कादायक ! लग्नाला वर्ष होण्याआधीच जोडप्याची विष पिऊन आत्महत्या, गूढ कायम
ADVERTISEMENT
काही वेळाने पोलिसांना दोन्ही प्रेमी जोड्याने दिलीप बोडखे यांच्या शेतात विष प्राशन केल्याची माहिती मिळाली होती.. सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर दोघांनाही नागपुरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे उपचार दरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नरखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT