कोरोनाबाबत आणखी एक धक्कादायक माहिती आली समोर… कोरोना हवेतून पसरतो
मुंबई तकः कोव्हिड १९ हा सार्स -२ प्रकाराचा व्हायरस हवेतून पसरत नाही, हा मुख्य वैज्ञानिक दृष्टिकोनच लॅन्सेट जर्नलच्या अहवालाने फेटाळून लावला आहे. तसंच रुग्णांसाठीचा सेफ्टी प्रोटोकॉल तातडीने बदलला पाहिजे अशी नोंद या अहवालात करण्यात आली आहे. यात तज्ज्ञांनी दिलेली कारणं विचारात घेतली तर घरातही मास्क लावण्याची वेळ येऊ शकते. ‘द लॅन्सेट’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या […]
ADVERTISEMENT
मुंबई तकः कोव्हिड १९ हा सार्स -२ प्रकाराचा व्हायरस हवेतून पसरत नाही, हा मुख्य वैज्ञानिक दृष्टिकोनच लॅन्सेट जर्नलच्या अहवालाने फेटाळून लावला आहे. तसंच रुग्णांसाठीचा सेफ्टी प्रोटोकॉल तातडीने बदलला पाहिजे अशी नोंद या अहवालात करण्यात आली आहे. यात तज्ज्ञांनी दिलेली कारणं विचारात घेतली तर घरातही मास्क लावण्याची वेळ येऊ शकते.
ADVERTISEMENT
‘द लॅन्सेट’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाने कोविड -19 हाला कारण ठरणारा सार्स कोव्ही – 2 हा हवेतून पसरणारा व्हायरस नाही, असा प्रमुख वैज्ञानिक दृष्टिकोन नाकारला आहे. अहवाल मांडणाऱ्या लेखकांनी हा व्हायरस हवेव्दारे पसरतो असं नमूद करत ” याची 10 कारणे दिली आहेत .
यूके, अमेरिका आणि कॅनडाच्या सहा तज्ज्ञांनी हा पेपर लिहिला आहे. ‘ हा आजार हवेतून पसरत नाही असा निष्कर्ष काढण्यासाठीची कारणे अपुरी आहेत” तर “वैज्ञानिक पुरावे याऊलट पुरावा देतात” असं तज्ञांचं म्हणणं आहे. याकरीता कोव्हिड – 19 च्या सुरक्षेच्या नियमांमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
हे वाचलं का?
“Ten streams of evidence collectively support the hypothesis that #SARS-CoV-2 is transmitted primarily by the airborne route.”
New Comment from @trishgreenhalgh, @kprather88, @jljcolorado, @zeynep, @dfisman, and Robert Schooley. #COVID19 https://t.co/2z8jLEcOPH
— The Lancet (@TheLancet) April 16, 2021
कोव्हिडच्या प्रसाराची तज्ञांनी दिलेली 10 कारणे
1- प्रयोगशाळांमध्ये केलेल्या परिक्षणांमध्ये हा व्हायरस हवेत असल्याचे नोंदवले गेले आहे. हा व्हायरस हवेत तीन तास जीवंत राहत असल्याचे यामध्ये नोंद करण्यात आली.
ADVERTISEMENT
2- क्वारंटाईन हॉटेल्समध्ये एकमेकाला लागून असलेल्या खोल्यांमधील व्यक्तींमध्ये हा संसर्ग आढळला. हे लोक एकमेकांच्या खोल्यांमध्ये न जाताच विषाणूचा प्रसार आढळलाय. पण याचं डॉक्यूमेंटेशन करण्यात आलेलं नसल्याचंही तज्ञांचं म्हणणं आहे.
ADVERTISEMENT
3- कोव्हिडचा प्रसार हा बाहेरच्या वातावरणापेक्षा बंद वातावरणात जास्त मोठ्या प्रमाणावर होतो. ते कमी करण्यासाठी बंद खोलीमध्ये वायूविजन चांगले असण्याची आवश्यकता आहे.
4- सार्स पसरवण्यासाठी सुपरस्प्रेडिंग इव्हेंट मोठ्या प्रमाणावर कारण ठरले आहेत. प्राथमिकदृष्ट्या याच कार्यक्रमामुळे महामारी पसरल्याचं कारण तज्ञांनी दिलं आहे. केवळ थुंकीव्दारेच हा आजार पसरत नाही तर, मानवी वर्तणूक ,खोलीचे आकार, वायुवीजन ही आणि इतर कारणंदेखील संसर्गासाठी महत्त्वाची आहेत.
5- तज्ञांनी असा युक्तिवाद केला की खोकल्याची किंवा शिंका न येणा-या व्यक्ती एसिम्टोमॅटिक किंवा प्रिसिम्टोमॅटिक रुग्ण वाढवायला कारणीभूत ठरले आहेत. अशा प्रकारे सार्स पसरवणाऱ्यांचे प्रमाण 33 टक्के ते 59 टक्क्यांपर्यंत आहे.
6 – पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या प्राण्यांनाही या विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
7 – आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई किट वापरले त्या ठिकाणी नोसोकॉमियल इन्फेक्शन (जे रुग्णालयात असतं) आढळले. पीपीई किट ही थेट संपर्क आणि ड्रॉपलेटपासून सुरक्षेसाठी बनविली गेली आहे, परंतु हवेतून प्रसार टाळण्याचा कोणताही मार्ग नाही.
8 कोरोना रुग्णालयांतील एअर फिल्टर्स आणि बिल्डिंग डक्ट्समध्येही हा विषाणू आढळला आहे. या ठिकाणी फक्त हवेच्या माध्यमातूनच विषाणू पसरू शकतो.
9- श्वासोच्छवासाचे थेंब किंवा फोमाइटसारख्या इतर मार्गांनी व्हायरस पसरल्याचे जसे पुरावे आहेत, तसे इतर मार्गांनी तो पसरू शकतो याचे फारसे पुरावे नाहीत.
10 – हा विषाणू हवेतून पसरत नाही हे सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत असंही या अहवालात तज्ज्ञांनी मत मांडलं आहे.
तज्ञांनी दिलेली ही कारणं पुढच्या काळात महत्त्वाची ठरणार आहेत. ज्याने कोव्हिडबाबतच्या रणनितीमध्ये संपूर्ण जगाला बदल करावा लागणार आहे. तज्ञांनी दिलेली कारणं विचारात घेतली तर घरामध्येही मास्क घालून बसायची वेळ येऊ शकते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT