Omicron Variant : 40 वर्षापुढील भारतीयांना बुस्टर डोस द्यायला हवा -जिनोम कॉन्सॉर्टियम

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे जगभरात तिसरी उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी काही देशांनी बुस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला असून, भारतात याबद्दल केंद्राने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. असं असलं, तर केंद्र सरकारने स्थापन केलेल्या जिनोमिक्स कॉन्सॉर्टियमने (केंद्र सरकारने स्थापन केलेली जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांची राष्ट्रीय पातळीवरील बहु-संस्था) 40 वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस देण्याची शिफारस केली आहे.

ADVERTISEMENT

द इंडिअन सार्स-को व्ही–2 जिनोमिक्स कॉन्सॉर्टियमने (केंद्र सरकारने स्थापन केलेली जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांची राष्ट्रीय पातळीवरील बहु-संस्था) साप्ताहिक बुलेटीनमध्ये बुस्टर डोस देण्यासंदर्भातील शिफारस केली आहे. संसर्गाची जोखीम असलेल्यांसह 40 वर्षांपुढील नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस देण्यात यावा असं महत्त्वाच्या जिनोम तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

‘देशात आतापर्यंत लसीकरण न झालेल्या नागरिकांचं लसीकरण करणं, त्याचबरोबर 40 वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या लोकांसाठी बुस्टर डोसचा विचार करायला हवा. सगळ्या आधी संसर्गाची उच्च जोखीम असलेल्या किंवा संसर्गाचा अधिक धोका असलेल्या लोकांना बुस्टर डोस देण्याबद्दल विचार केला जाऊ शकतो’, असं जिनोम कॉन्सॉर्टियमने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर जगभरात पुन्हा प्रतिबंधात्मक उपाययोजना आक्रमकपणे राबवल्या जाताना दिसत आहे. ब्रिटनने दोन डोस झालेल्या नागरिकांना बुस्टर डोस देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर अमेरिकेतही बुस्टर दिला जात आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर भारतातही बुस्टर डोस देण्याचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे.

सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात अनेक खासदारांनी बुस्टर डोसचा मुद्दा चर्चेदरम्यान उपस्थित केला आहे. त्यातच आता INSACOG ने (केंद्र सरकारने स्थापन केलेली जनुकीय क्रमनिर्धारणाबाबत संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळांची राष्ट्रीय पातळीवरील बहु-संस्था) बुस्टर डोसबद्दल भूमिका मांडली आहे.

ADVERTISEMENT

सार्वजनिक आरोग्य उपायांना अधिक बळकट करण्यासाठी अशा स्वरुपाच्या व्हेरिएंटचं तातडीन निदान करण्यासाठी जिनोमवर निगराणी ठेवणं महत्त्वाचं आहे. सध्या देण्यात आलेल्या दोन डोजमुळे निर्माण होणाऱ्या अँटीबॉडीजमध्ये ओमिक्रॉनला निष्क्रिय करण्याची पुरेशी क्षमता नाही, असंही जिनोम कॉन्सॉर्टियमने म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT