बुलढाणा : रात्री डी.जे. सुरु ठेवण्यासाठी पोलिसांचा मज्जाव, नागरिकांचा पोलीस ठाण्यात धुडगूस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– ज़का खान, बुलढाणा प्रतिनिधी

ADVERTISEMENT

रात्री दीड वाजल्याच्या सुमारास सुरु असलेला डी.जे. बंद करण्यास सांगितल्यामुळे नागरिकांनी पोलीस ठाण्यात धुडगूस घालून तोडफोड केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात ६ लोकांवर गुन्हा दाखल केला असून यात दोन महिलांचाही समावेश आहे.

या संदर्भात DYSP अमोल कोली यानी दिलेलेल्या महितीनुसार, शेगाव शहरातील विश्वनाथ नगर मध्ये एकाकडे वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु होतं. या कार्यक्रमात डीजे लावून गोंधळ सुरू होता, डीजेच्या या आवाजामुळे परिसरातील नागरिकांचा याचा त्रास व्हायला लागला. ज्यानंतर काही नागरिकांनी फोन करुन शेगाव पोलीस ठाण्याला याबद्दलची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळी पोहतच डीजे तात्काळ बंद करण्यास सांगितलं.

हे वाचलं का?

यादरम्यान एका व्यक्तीने पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला पोलीस ठाण्यात आणलं असता दोन महिला आणि चार पुरुष त्याच्या मागून पोलीस ठाण्यात आले. यानंतर त्यांनी ड्युटीवर उपस्थित असलेल्या पोलिसांसोबत बाचाबाची केली. हा वाद वाढल्यानंतर या व्यक्तींनी पोलीस ठाण्यात तोडफोड करत फर्निचर आणि इतर सामानाची नासधुस केली.

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू, परिवारावर दुःखाचा डोंगर

ADVERTISEMENT

या प्रकरणी गाव पोलिसांनी सहा जणांविरुद्ध 353 सहित 143, 147, 332 आणि सार्वजनिक मालमत्ता हानी कलम 3, 7 नुसार गुन्हा दाखल केला आहे. DYSP अमोल कोळींनी सांगितल्याप्रमाणे, CCTV फुटेजच्या आधारावर अजुन काही लोकांचा या प्रकरणात सहभाग निष्पन्न असल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल.

ADVERTISEMENT

ह्रदयद्रावक! लेकीला वाचण्यासाठी आईवडिलांनी केले शर्थीचे प्रयत्न, पण चिमुकलीसह आईचाही मृत्यू

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT