Nashik : ५ लाखांच्या नोटा Currency Note Press मधून गायब
नाशिकमधील Currency Note Press मधून ५ लाख किमतीच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे फेब्रुवारी ते जुलै अशा ५ महिन्यांच्या काळात हा अज्ञात व्यक्ती नाशिकमधल्या या प्रेसमधून हे पैसे चोरत असल्याचं समोर आलं आहे. पाच महिन्यांच्या काळात या अज्ञात व्यक्तीने नाशिक प्रेसमधून ५ लाखांच्या नोटा चोरल्या असून पोलिसांनी या […]
ADVERTISEMENT
नाशिकमधील Currency Note Press मधून ५ लाख किमतीच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे फेब्रुवारी ते जुलै अशा ५ महिन्यांच्या काळात हा अज्ञात व्यक्ती नाशिकमधल्या या प्रेसमधून हे पैसे चोरत असल्याचं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
पाच महिन्यांच्या काळात या अज्ञात व्यक्तीने नाशिक प्रेसमधून ५ लाखांच्या नोटा चोरल्या असून पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. छपाई करण्यात आलेल्या नोटांमंधून ५ लाख किंमतीच्या नोटा गायब असल्याचं लक्षात येताच नाशिक प्रेसच्या व्यवस्थापनाने याबद्दलची चौकशी करायला सुरुवात केली आहे.
नोटांची छपाई होत असलेल्या नाशिकमधील प्रेसमध्ये सुरक्षा व्यवस्था ही कडक असते. परंतू अशा परिस्थितीतही नोटांची चोरी झाल्यामुळे पोलिसांनाही धक्का बसला आहे. नोटांची छपाई करणारी नाशिक प्रेस ही भारतातील सर्वात जुनी प्रेस असून इथे पासपोर्ट आणि सरकारी महत्वाचे कागदपत्र छापले जातात. पोलिस सध्या या अज्ञात व्यक्तीच्या शोधात आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT