नागपूर : पशुखाद्याच्या आड मद्यतस्करी करणारे आरोपी ताब्यात
लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवेत शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आलेली आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन पशुखाद्याच्या आड अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. मध्यप्रदेशामधून हा दारुचा साठा नागपुरात आणला जाणार होता अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार अधिकाऱ्यांनी पांधूर्णा – सावनेर – नागपूर मार्गावर सापळा रचला. नागपूरच्या दिशेने येणाऱ्या […]
ADVERTISEMENT
लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवेत शेतीच्या कामांना परवानगी देण्यात आलेली आहे. याच गोष्टीचा फायदा घेऊन पशुखाद्याच्या आड अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. मध्यप्रदेशामधून हा दारुचा साठा नागपुरात आणला जाणार होता अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती.
ADVERTISEMENT
यानुसार अधिकाऱ्यांनी पांधूर्णा – सावनेर – नागपूर मार्गावर सापळा रचला. नागपूरच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना एका पशुखाद्याच्या गाडीत अवैधरित्या दारुचा साठा अधिकाऱ्यांना सापडला. अधिकाऱ्यांनी या गाडीतल्या ४५ बाटल्या तात्काळ जप्त केल्या असून गाडीचा चालक आणि क्लिनर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेलं वाहन, दारुचा साठा, मोबाईल असा सर्व मुद्देमाल पकडून ६३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची सध्या चौकशी सुरु आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT