नागपूर: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेलेल्या तरुणाचा मृतदेहच सापडला; रूममध्ये काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर

ADVERTISEMENT

नागपूर: महाराष्ट्रातील नागपूरच्या ग्रामीण भागातील सावनेर येथील एका लॉजमध्ये एका तरुणाचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला आहे. त्याच्या खिशात लैंगिक शक्तीवर्धक गोळ्या सापडल्या आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. मृताचे वय 27 वर्षे आहे. मृतक हा नागपुरातील कळमेश्वर धापेवाडा येथील रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी लॉजमध्ये तरुणासोबत त्याची गर्लप्रेंडही उपस्थित होती. तरुण अचानक बेशुद्ध पडल्याने गर्लप्रेंडने धापेवाडा येथील त्याच्या मित्राला माहिती दिली. त्यानंतर एक मित्र गाडी घेऊन सावनेरला पोहोचला. तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणाची प्रकृती चिंताजनक पाहून डॉक्टरांनी त्याला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तरुणाला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. याप्रकरणी गर्लप्रेंडचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

हे वाचलं का?

सावनेर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मारुती मुळूक यांनी आज तकला सांगितले की, तरुण गेल्या काही दिवसांपासून आजारी होता. डिहायड्रेशनमुळे त्यांच्या शरीरात पाण्याची कमतरता होती. तरुणाच्या खिशात लैंगिक शक्तीवर्धक गोळ्या सापडल्या आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसे, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.

वर्षभरापुर्वी नागपूरात घडली होती ‘अशीच’ घटना

ADVERTISEMENT

वर्षभरापुर्वी असाच एक प्रकार समोर आला होता. पॉर्न फिल्म पाहून वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करण्याचा मोह एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला होता. दोरीचा वापर करुन संभोग करण्याच्या नादात तरुणाला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना नागपूरातील सावनेर तालुक्यातील एका लॉजवर घडली होती.

ADVERTISEMENT

सदर घटनेतील तरुण २७ वर्षांचा होता आणि तरुणी २० वर्षांची होती. तरुणाला पॉर्न फिल्म बघण्याची सवय होती, त्यामुळे त्याने वेगळा प्रयोग करण्याचा विचार केला. त्यावेळी मुलाचे दोरीने हात-पाय बांधण्यात आले होते. काही वेळाने तिच दोरी तरुणाच्या गळ्याभोवसी आवळण्यात आली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT