मुंबईत लसीकरणानंतर 60 वर्षांच्या पुढील व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रमाणात घट; तज्ज्ञांचं मत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. देशात आलेली ही कोरोनाची दुसरी लाट मानली जातेय. तर अशातच मुंबईत लसीकरणामुळे दुसऱ्या लाटेत जेष्ठ नागरिकांमधील मृत्यूचं प्रमाण कमी झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. लंडनचे गणितज्ज्ञ मुराद बनजी यांनी दुसर्‍या लाटेत ज्येष्ठ नागरिकांमध्ये 40% कमी मृत्यू झाल्याचं म्हटलंय.

ADVERTISEMENT

बनजी यांनी यासंदर्भात ट्विट केलंय. ते म्हणतात, भारतातून सध्या फारशी चांगली बातमी येत नाही. मात्र मुंबईतील एकूणच आकडेवारीनुसार, लसीकरणामुळे मृत्यू कमी झाल्याचं दिसून येतंय.

कुणी व्हॅक्सिन देता का व्हॅक्सिन? मुंबईत अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंद

हे वाचलं का?

ते पुढे म्हणाले, गेल्या वर्षाच्या मार्चमधील 60 वर्षांच्या वरील लोकांच्या मृत्यूचा दर पाहिला तर यावेळी तो 40 टक्क्यांनी कमी झालेला दिसून येतोय.

दरम्यान यासदंर्भात वक्तव्य करताना राज्य सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणाले, लसीकरण आणि त्यामुळे कमी होणारे मृत्यू याबाबत इतक्या लवकर भाष्य करणं योग्य ठरणार नाही.

ADVERTISEMENT

सध्याच्या परिस्थितीत मुंबईच्या 1.4 करोड लोकसंख्येपैकी केवळ 18.5 लाख लोकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांच्या माहितीनुसार, सार्वजनिक आरोग्य विभागानेही जेष्ठ नागरिकांच्या मृत्यूमध्ये घट झाल्याची नोंद केली होती. यासंदर्भातील माहितीवर आम्ही अजून काम करतोय.

ADVERTISEMENT

Covishield लसीची किंमत जाहीर, ‘ही’ लस घेण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

मुंबईतील डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, कोव्हिडच्या लसीमुळे लोकांमध्ये लक्षणांची तीव्रता कमी झाली आहे. भारतात केवळ 8.3 टक्के लोकांचं आत्तापर्यंत लसीकरण झालं आहे.

तर इतर देशांमध्ये लस दिल्यानंतर रूग्णांना रूग्णालयात भरती करण्याच्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलंय. वेल्लोरेमधील ख्रिस्तियन मेडिकल कॉलेजचे डॉ. गगनदीप कंग ज्यांनी लसींसंदर्भात काम केलं आहे, ते म्हणतात, युनायटेड किंग्डममध्ये लसीकरणानंतर रूग्णालयात भरती करण्याच्या प्रमाणात 70 टक्क्यांनी घट झाली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT