कोरोनाचा Delta Variant जगात वेगाने पसरतो आहे हातपाय WHO ने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट हा वेगाने पसरतो आहे. हा व्हेरिएंट सर्वात आधी भारतातच आढळून आला. आता तो 100 देशांमध्ये पसरला आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनाचा डेल्टा हा व्हेरिएंट मूळ व्हायरसपेक्षा अडीच पट जास्त वेगाने पसरतो असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. दुसऱ्या लाटेचा मोठा फटका आपल्या देशाला बसला. इतर देशांनाही तो बसला मात्र भारतात दुसऱ्या लाटेत कोरोना वेगाने पसरवण्याचं काम डेल्टा व्हेरिएंटने केलं. या डेल्टाबाबतच आता WHO ने महत्त्वाची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

भारत, US, UK, रशिया आणि इतर अनेक देशांमध्ये कोरोना संसर्ग वाढण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत आहे असं WHO ने म्हटलं आहे. इंडिया टुडेचं डाटा इंटेलिजन्स युनिटने GISAID ने उल्लेख केलेल्या 78 देशांचं निरीक्षण केलं त्या निरीक्षणात हेच दिसून आलं की डेल्टा व्हेरिएंटमुळे भारत, यूके, रशिया, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका या आणि अशा 78 देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटच कोरोना संसर्ग वाढण्यासाठी कारणीभूत ठरला.

डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. भारतात दुसरी लाट येण्यसाठी कोरोनाचा हा व्हेरिएंट मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरला. आता भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण आढळण्यासही सुरूवात झाली आहे आणि हादेखील चिंतेचाच विषय आहे. 29 जून 2021 ला म्हणजेच तीन दिवसांपूर्वीच समोर आलेल्या अहवालाप्रमाणे जगातल्या 96 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या केसेस आढळल्या आहेत. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे कोरोनाचं संसर्ग किंवा ज्या संक्रमण म्हटलं जातं ते मोठ्या प्रमाणावर होतं असंही WHO ने म्हटलं आहे. तसंच या व्हेरिएंटमुळे जो संसर्ग वाढला त्यामुळे अनेक रूग्णांना रूग्णालयांमध्ये दाखल करण्याची वेळ विविध देशांच्या सरकारांवर आली असंही WHO ने स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

मागील आठवड्यात ब्राझिलमध्ये कोरोनाच्या सर्वाधिक केसेस पाहण्यास मिळाल्या. त्याआधीच्या आठवड्याच्या तुलनेत हे प्रमाण जास्त होतं. त्यानंतर भारतात जास्त रूग्णसंख्या पाहण्यास मिळाली. तर त्यानंतर अनुक्रमे कोलंबया आणि रशिया या देशांमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढल्याचं WHO ने त्यांच्या अहवालात स्पष्ट केलं आहे. डेल्टा व्हेरिएंटबाबत चिंता वाटत असलेल्या ऑस्ट्रेलियाने तिथल्या काही शहरांमध्ये Lockdown लागू केला आहे. 27 जूनपासून दोन आठवड्यांचे निर्बंध तिथे लादण्यात आले आहेत. डेल्टा व्हेरिएंटने जशी काळजी वाढवली आहे तसंच येणाऱ्या काळात आणखी काही व्हेरिएंट आढळू शकतात अशीही चिंता WHO ने व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT