फडणवीस-जयंत पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास, भाजपची नवी खेळी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नंदूरबार: महाराष्ट्रात सध्याच्या घडीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन पक्षाचं मिळून सरकार अस्तित्वात आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी या तीनही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली. असं असताना आता मात्र, राज्यातील राजकारण हे एका वेगळ्याच दिशेनं चाललं आहे. कारण, एकीकडे भाजप-शिवसेना पुन्हा जवळ येण्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे एकाच कारमधून प्रवास करत असल्याचं पाहायला मिळालं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सध्या राजकीय पातळीवर बऱ्याच प्रमाणात कुरघोडीचं राजकारण सुरु झालेलं पाहायला मिळत आहे. एकीकडे भाजप नेते हे सत्तेसाठी शिवसेनेला चुचकारत आहेत तर शिवसेना देखील भाजपला गोंजारत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे हे दोन्ही पक्ष एकत्र येणार का? या चर्चेने वेग धरलेला असताना दुसरीकडे नंदूरबारमध्ये एकाच फडणवीस आणि जयंत पाटलांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवास केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

विधिमंडळात आणि जाहीर सभांमध्ये जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा एकमेकांची अक्षरशः पिसं काढलेली आहेत. असं असताना अचानक दोन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याने आता आणखी वेगळ्याच चर्चेला उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये भाजपच्या रावसाहेब दानवे यांना उद्देशून ‘भावी सहकारी’ असं म्हटलं होतं. ज्याला 24 तासही पूर्ण होत नाही तोच आज (18 सप्टेंबर) भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचं समोर आलं आहे. यावेळी या दोन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, राज्याची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने काही नवी खेळी तर सुरु केलेली नाही ना? याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत.

ADVERTISEMENT

नंदुरबार जिल्ह्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी पी. के. अण्णा पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळानिमित्त विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस तसेच महाविकास आघाडीचे नेते कार्यक्रमास उपस्थित होते.

ADVERTISEMENT

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे नेते तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते हे सध्या काही सूचक विधान करत आहेत भविष्यामध्ये राजकारणात काहीही शक्य होऊ शकतं असे देखील सूचक विधान या राजकीय नेत्यांकडून केले जात आहेत.

या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस, मंत्री जयंत पाटील, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील हे उपस्थित होते.

राज्यात शिवसेना-भाजप युतीची चर्चा; आता नितेश राणे म्हणतात…

भाजप राष्ट्रवादीच्या साथीने सत्ता स्थापन करणार?

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हे स्पष्ट झालं की, कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करु शकत नाही. त्यात महाविकास आघडी स्थापन झाल्याने भाजपला थेट विरोधी बाकावर जाऊन बसावं लागलं आहे. गेल्या दोन वर्षापासून सत्तेत येण्यासाठी भाजपचे अनेक प्रयत्न चालले असल्याचं दिसून येत आहे. पण त्यात त्यांना अद्याप काहीही यश आलेलं नाही.

जर भाजपला राज्यात सत्ताबदल घडवून आणायचा असेल तर कोणत्या तरी एका पक्षाच्या पाठिंब्याशिवाय त्यांना सत्ता आणता येणार नाही हे स्पष्टच आहे. त्यामुळेच भाजपकडून देखील काही गोष्टींची नक्कीच चाचपणी सुरु आहे. जर भाजपला सत्तेचं सोपान गाठायचं असेल तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पर्याय त्यांच्यासमोर असणार आहेत.

दरम्यान, याआधी भाजप नेत्यांनी अजित पवारांच्या साथीने 72 तासांचं सरकार स्थापन करुन तोंडघशी पडण्याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर कितपत विश्वास ठेवायचा हा भाजपच्या नेतृत्वासमोरचा मुख्य प्रश्न असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT