मंत्री झाले राजे, प्रत्येक विभागात एक एक वाझे- फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पोलीस विभागातील एक वाझे तर सापडला, पण अन्य विभागांमधल्या अन्य वाझेंचा पत्ता आम्हाला लागला आहे. त्यामुळेच हे सरकार पावसाळी अधिवेशन दोन दिवसात गुंडाळू पाहतं आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर कोरोना, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवरून त्यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात कोव्हिडच्या काळात प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोव्हिडमुळे सर्वात जास्त मृत्यू झाले ते महाराष्ट्रात. दुसऱ्या लाटेत लोक तडफडून मेले. ऑक्सिजन अभावी काही लोकांचा जीव गेला. अशात हे सरकार मात्र स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न राहिलं. स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्यांना मला एकच प्रश्न विचारावासा वाटतो आणि तो म्हणजे तुमचं डोकं ठिकाणावर आहे का?

कोरोना मुक्तीचं कुठल मॅाडेल आणलंय, कुणी आणलंय, कसं आणलंय, देशात कोव्हिडमुळे मेलेला प्रत्येक तिसरा व्यक्ती महाराष्ट्रातील आहे. किड्या मुंग्यासारखे लोक मेले. उत्तर प्रदेशात गंगा नदीत मृतदेह आढळले म्हणून गोंधळ माजवला, पण बीडमध्ये एका रुग्णवाहिकेत 22 मृतदेह कोंबले, हे मॉडेल कुठलं? असा सवालही फडणवीसांनी केलाय.

हे वाचलं का?

OBC समाजाची फसवणूक आणि विश्वासघात ठाकरे सरकारने थांबवावा-फडणवीस

मुंबईच्या बाहेर महाराष्ट्र आहे का? नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे महाराष्ट्रात आहे का? मग कुठे आहे सरकार? नाशिक, नागपूर, औरंगाबादमध्ये एक कोविड सेंटर या सरकारनं काढलं का दाखवा? कोरोना काळात प्रत्येक खरेदीमध्ये भ्रष्टाचार पाहायला मिळाल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय. राज्यात फक्त वसुली सरकार, 100-100 कोटी रूपयांच्या वसुली, पोलिसातला वाझे सापडला, अजून वेगवेगळ्या विभागातले वाझे आहेत, त्यांचे पत्ते आम्हाला सापडले आहेत, आमच्याकडे त्यांचे पत्ते आलेत, त्यामुळे अधिवेशन गुंडाळलं. अधिवेशनापासून हे सरकार पळ काढतंय कारण असं केलं तर आपला भ्रष्टाचार बाहेर येईल, असा दावाही फडणवीसांनी केलाय.

ADVERTISEMENT

कुठल्याही मंत्र्याने माझ्याशी डिबेट करावी, ओबीसी आरक्षण जायला फक्त या सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार. पिटीशन टाकणारे कोण, एक काँग्रेस आमदारांचा मुलगा आणि एक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष, ती पिटीशन हायकोर्टात आलं. पिटीशन ५० टक्क्यावरील आरक्षणाबाबत होती, बावनकुळेंना इन्चार्ज केलं, ५० टक्क्यांवरील आरक्षण आम्ही टिकवलं. मग ते सुप्रीम कोर्टात गेले. तिथे आम्ही म्हणणं मांडलंच, पण निवडणुका घेण्याचीही परवानगी पूर्ण आरक्षणासहित देण्यात आली. ५० टक्क्यावरील आरक्षण वाचवण्यासाठी आरक्षण थंबरुल होऊ शकत नाही असं कोर्टाने म्हटलं. आम्ही एका रात्रीत अध्यादेश काढला, तो सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT