देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होणार?, पोलीस आयुक्तांच्या भेटीनंतर चर्चा
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वांना वाटत होते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार परिणामी त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी कामाला सुरुवात केली आहे. बैठकांचा धडाका लावला आहे. पहिल्या भेटीत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दालनातील आणि विभागातील कामाचा आढावा घेतला आणि काही गोष्टी बदलण्याचे सूचना दिल्या आहेत. […]
ADVERTISEMENT
मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वांना वाटत होते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार परिणामी त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले. पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीसांनी कामाला सुरुवात केली आहे. बैठकांचा धडाका लावला आहे. पहिल्या भेटीत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दालनातील आणि विभागातील कामाचा आढावा घेतला आणि काही गोष्टी बदलण्याचे सूचना दिल्या आहेत. त्यांनी विवेक फणसाळकर यांची भेट घेतली.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर राज्याचे नवीन मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत चर्चा होत आहेत. महाविकास आघाडी सरकारने गृहखाताच्या वापर करुन भाजपच्या नेत्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. आघाडी सरकारने गृहमंत्री पदाचा वापर करुन अनेक गैरप्रकार केले असा आरोप भाजप करत होते. आणि नंतर अनिल देशमुखांच्या (Anil Deshmukh) रुपात सरकार अडचणीत आले होते. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी गृहखाते आपल्याकडेच ठेवले होते, त्यामुळे ते परत हे खातं आपल्याकडे घेणार असल्याच्या चर्चा आहेत. कारण गृहखातं सरकारमधील महत्त्वाचं खातं मानले जाते. अशात देवेंद्र फडणवीस यांनी विवेक फणसाळकर यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा गृहमंत्री फडणवीसच होणार का? या चर्चा रंगल्या आहेत.
The newly appointed @CPMumbaiPolice Vivek Phansalkar calls on the DCM @Dev_Fadnavis, this morning. pic.twitter.com/PRJhTTGeNU
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) July 1, 2022
दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना फोन टॅपिंगचे प्रकरण गाजले होते. पुण्याच्या तेव्हाच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात आघाडी सरकारने गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्हाचा तपास हा थेट फडणवीस यांच्यापर्यंत घेवून जाण्याचा प्रयत्न केला होता. नाना पटोले, एकनाथ खडसे यांचे फोन टॅप झाल्याचा आरोप आहे.
हे वाचलं का?
आता देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि हे कायदेशीरदृष्ट्या बाहेर पडण्यासाठी फडणवीस गृहखाते आपल्याकडे घेतील असे बोलले जात आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे नवीन पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यामुळे पोलीस खात्यातंही फडणवीस गृहमंत्री होण्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT