Dharmaveer Anand Dighe :धर्मवीर आनंद दिघे यांची ‘आर्माडा’ बघितलीत का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

‘ठाण्याचे बाळ ठाकरे’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील चित्रपट पडद्यावर झळकला.

‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’, असं या चित्रपटाचं नाव असून, या चित्रपटामुळे आनंद दिघे यांच्या आयुष्यातील घटना उजाळा दिला गेला.

हे वाचलं का?

आनंद दिघे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांबरोबरच एक गोष्टीची चर्चा नेहमीच होते. ती म्हणजे त्यांच्या आर्माडा गाडीची.

धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावरील या चित्रपटात दिघे यांची आवडीची आर्माडा गाडी वापरण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

ही आर्माडा (एमएच ०५ – जी – २०१३) गाडी बघितली की, त्यावेळच्या शिवसैनिकांना आजही आनंद दिघे यांच्या आठवणींनी गलबलून येतं.

ADVERTISEMENT

ही गाडी आनंद दिघे यांची ओळख होती. या गाडीला आजही शिवसैनिकांच्या मनात आदराच स्थान आहे.

आनंद दिघे कुठेही प्रवास करताना ही गाडी वापरायचे. त्यांनी राज्यभर गाडीतून प्रवास केला. त्यामुळे या गाडीसोबतचे अनेक प्रसंग शिवासैनिकांसोबत जोडले गेलेले आहेत.

या गाडीची खासियत म्हणजे शिवसैनिकांना लगेच तिची चाहूल लागायची आणि आनंद दिघे आल्याचंही कळायचं.

जवळपास २० वर्षांपूर्वी याच गाडीतून प्रवास करत असताना आनंद दिघे यांचा अपघात झाला होता. त्यानंतर ही आर्माडा गाडी कधीच रस्त्यावर दिसली नाही.

महत्त्वाच्या प्रसंगी आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळाजवळ ही गाडी उभी केली जाते. जेव्हा ही गाडी त्यावेळचे शिवसैनिक बघतात, तेव्हा ते भावूक होऊन जातात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT