पुणे: ऑफिसच्या 7 व्या मजल्यावरुन उडी अन् सुसाइड नोटसुद्धा... पुण्यातील IT इंजिनीयरचं टोकाचं पाऊल

मुंबई तक

पुण्यातील हिंजवडीमधून एका IT इंजिनीअर म्हणून कार्यरत असणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. पीडित तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाइड नोट देखील लिहिली होती. नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

पुण्यातील IT इंजिनीयरचं टोकाचं पाऊल
पुण्यातील IT इंजिनीयरचं टोकाचं पाऊल
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील आयटी इंजिनीयरची आत्महत्या

point

ऑफिसच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:ला संपवलं

point

सुसाइड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं?

Pune Crime: पुण्यातील हिंजवडीमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे एका IT इंजिनीअर म्हणून कार्यरत असणाऱ्या 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. मृत पावलेल्या तरुणाचं नाव पीयूष अशोक कवडे असून त्याने अॅटलस कंपनीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:चं आयुष्य संपवल्याचं सांगितलं जात आहे. सोमवारी (28 जुलै) रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

छातीत दुखत असल्याचं सांगून बाहेर आला अन्...

पोलिसांच्या माहितीनुसार, पीयूष मागील वर्षभरापासून हिंजवडी फेज वनमधील अॅटलस कंपनीमध्ये आयटी इंजिनीयर म्हणून कार्यरत होता. आत्महत्या करण्यापूर्वी पीयूष ऑफिसची एक मीटिंग अटेन्ड करत होता. मीटिंग सुरु असताना त्याच्या छातीत दुखत असल्याचं पीयूषने सांगितलं. थोडा आराम करायचा असल्याचं म्हणत तो मीटिंग रुममधून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर काही मिनिटांनंतर त्याने कंपनीच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. 

हे ही वाचा: महिला शेजाऱ्यासोबत नको ते करायची..तिच्या 24 वर्षांच्या मुलानं पाहिलं! नंतर झाला खतरनाक मर्डर अन्..

सूसाइट नोटमध्ये काय लिहिलं? 

घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तपासादरम्यान, पोलिसांनी पीयूषने लिहिलेली एक सुसाइट नोटसुद्धा सापडली. "मी जीवनात प्रत्येक वेळी अयशस्वी ठरलो. मला माफ करा." असं पीयूषने सुसाइड नोटमध्ये लिहिलं होतं. 

पोलिसांच्या मते, पीयूष मानसिक तणावाने त्रस्त होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी घटनेची माहिती दिली आणि सांगितलं की, "ही घटना सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली, पीडित तरुणाजवळ एक सुसाईड नोट सापडली असून त्याच्या आधारे प्रकरणाचा खोलवर तपास केला जात आहे."

हे ही वाचा: पहलगाम हल्ल्यातील 'त्या' 3 दहशतवाद्यांचा जंगलात केला खात्मा! 'ऑपरेशन महादेव'ची देशभरात होतेय चर्चा

पोलिसांचा तपास 

पीयूषच्या मृत्यूमुळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून ऑफिसमधील सहकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. पीयूष कोणत्या प्रकारच्या व्यावसायिक दबावाखाली किंवा वैयक्तिक समस्येने त्रस्त होता का, ज्यामुळे त्याला हे टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडले गेले, याचा पोलीस तपास करत आहेत. सध्या प्रकरणासंदर्भात पोलिसांचा तपास सुरु असून आत्महत्या करण्यामागचं नेमकं कारण काय? याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp