आई नव्हे ही तर कसाई, आपल्याच बॉयफ्रेंडला लेकीच्या खोलीत पाठवलं अन् बाहेरून लावली कडी, नराधमाने व्हिडिओ शूट केले...

मुंबई तक

Crime News : आईने तिच्या प्रियकराला आपल्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यास सांगितलं. या घटनेनंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या.

ADVERTISEMENT

crime news mother's boyfriend sexually abused minor girl daughter
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

आईनं प्रियकराला मुलीच्या खोलीत पाठवलं

point

नेमकं काय घडलं?

Crime News : उत्तर प्रदेशातील औरैय येथे एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलेलं आहे. एका आईने आपल्या मुलीसोबत जे काही केलं आहे. ते वाचून तुम्ही डोकंच धराल. मुलीने आरोप केला की, आईने तिच्या प्रियकराला आपल्या मुलीचं लैंगिक शोषण करण्यास सांगितलं. या घटनेनंतर पीडितेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी आई आणि तिच्या प्रियकरावर लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : वसई हादरली! तरुणाने आपल्या आईचं डोकं भिंतीवर आपटलं, नंतर लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण ऐकून उडेल थरकाप

पोलिसांनी घटनेचा तपास केला असता, या घटनेमागे सुनियोजित कट असल्याचा संशय आहे. पीडित महिला ही औरैयातील कोतवाली पोलीस ठाणे परिसरातील रहिवासी आहे. तिने पोलिसांना सांगितलं की ती अकरावीत शिक्षण घेत आहे. तिच्या आईचे गावातील एका तरुणाशी अनैतिंक संबंध आहेत. त्या तरुणाचे नाव करण असे आहे. तिच्या आईला भेटण्यासाठी करण वारंवार यायचा. तो येताच आई त्याला बंद खोलीत घेऊन जायची. नंतर त्यांचं दार बंद व्हायचं, असा पीडित तरुणीने धक्कादायक आरोप केला आहे. 

आईने प्रियकराला मुलीच्या खोली पाठवले अन्...

तरुणीने आरोप केला की, दोन दिवसांपूर्वी आईचा प्रियकर तरुणीला भेटायला आला होता. त्यानंतर तो अचानकपणे तिच्या खोलीत घुसला आणि जबरदस्ती करू लागला. एवढंच नाही, तर तिच्या आईने स्वत: आरोपी तरुणाला एक दिवस आपल्या मुलीच्या खोलीत पाठवले आणि बाहेरून कडी लावली. त्या घटनेच्या दरम्यान संबंधित आरोपीने मुलीचे अनेक व्हिडिओ बनवले. 

हे ही वाचा : Maharashtra Weather: कोकणासह 'या' ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा, पश्चिम महाराष्ट्रात बरसणार जोरदार

पीडितेनं सांगितलं की, जेव्हा तिने या घटनेची वडिलांकडे केली. तेव्हा आरोपींनी तिला बेदम मारहाण केली. त्यांनी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपी करणने यापूर्वीही अनेकदा तिचा विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp