LPG Cylinder Prices: गॅस सिलेंडरच्या किंमतींचा पुन्हा भडका! किती झालीये वाढ?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

LPG Gas Price Hike
LPG Gas Price Hike
social share
google news

LPG Cylinder Latest Price: नवी दिल्ली: मार्चच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार असून, व्यावसायिक गॅस महागल्याने बाहेर खाणंही महागण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. घरगुती वापराच्या सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्यामुळे एलपीजी सिलेंडरचे दर आता 1100 रुपयांच्या घरात गेले आहेत. होळीच्या आधीच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे.

14.2 किलोग्राम घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढले आहेत. तर 19 किलोग्राम व्यावसायिक सिलेंडरचे दर 350 रुपयांनी वाढले आहेत. नवे दर लागू झाल्यानं देशभरात आता एलपीजी सिलेंडरसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

हे वाचलं का?

19 किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर दिल्लीत 2,119.50 रुपयांवर गेले आहेत. तर घरगुती एलपीजी सिलेंडरसाठी 1103 रुपये मोजावे लागणार आहे. ही नवी दरवाढ आजपासूनच लागू करण्यात आली आहे.

घरगुती एलपीजी गॅसचे दर कोणत्या शहरात किती वाढलेत?

पूर्वी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 1053 रुपये होते, ते आता 1103 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडर दर 1052.50 रुपये होते, ते आता 1102.5 रुपयांवर गेले आहेत. कोलकातामध्ये 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर 1079 रुपयांना होता, नव्या दरवाढीसह ते आता 1129 रुपयांवर पोहोचले आहेत. चेन्नईमध्ये 1068.50 रुपयांना मिळत होता. त्यासाठी आता 1118.5 रुपये मोजावे लागणार आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

 

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर कोणत्या शहरात किती वाढलेत?

दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे दर 1769 रुपये होते, नव्या दरवाढीमुळे ते 2119.5 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्येही व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी 1721 रुपये मोजावे लागत होते, त्यात वाढ होऊन ते आता 2071.5 रुपयांवर पोहोचले आहेत. कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचे पूर्वी दर 1870 रुपये होते, आता ते 2221.5 रुपयांवर गेले आहेत. चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडर 1917 रुपयांना मिळत होता, आता तो 2268 रुपयांना मिळणार आहे.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT