Mehul Choksi ला डोमिनिकन सरकारकडून दिलासा, बेकायदा प्रवेशाची केस रद्द

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mehul Choksi News : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात अडकलेल्या फरार मेहुल चोक्सीला डोमिनिकन सरकारने दिलासा दिला आहे. डोमिनिका मध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप त्याच्यावर होता. ज्या प्रकरणात त्याच्याविरोधातली कायदेशीर कारवाई मागे घेण्याचा निर्णय आता घेण्यात आला आहे. २०२१ मध्ये मेहुल चोक्सीवर डोमिनिकामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप करण्यात आला होता.

मेहुल चोक्सीच्या वकिलानं सांगितले की, डोमिनिकामधील बेकायदेशीर प्रवेशाच्या सर्व प्रकरणांमधील कारवाई २० मे रोजी मागे घेण्यात आली. प्रवक्त्याने सांगितले की, “डोमिनिका सरकारने मे 2021 मध्ये बेकायदेशीर प्रवेशाचे सर्व आरोप मागे घेतल्याने चोक्सी आनंदी आहे.” वकिलाने सांगितले की, ” मेहुल चोक्सीला भारतातील एजंट्सनी त्याच्या इच्छेविरुद्ध अँटिग्वामधून बळजबरीने बाहेर काढले. त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि बोटीतून डोमिनिका येथे नेण्यात आले, जिथे त्याने न केलेल्या गुन्ह्यासाठी त्याला बेकायदेशीरपणे अधिकार्‍यांकडे सोपवण्यात आलं होतं.” आता मेहुल चोक्सीसा डोमिनाका सरकारने त्याला या संदर्भातली कारवाई मागे घेत दिलासा दिला आहे.

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी मेहुल चोक्सीला गेल्या वर्षी म्हणजेच ३१ मे २०२१ ला अटक करण्यात आली. डोमनिकामध्ये त्याला अटक करण्यात आली असून त्याच्या भारतातील प्रत्यार्पणासाठीसंबंधीची सुनावणी तिथल्या कोर्टात सुरू होती. मेहुल चोक्सीचं भारतात प्रत्यार्पण करा अशी मागणी डोमनिका सरकारने कोर्टात केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

गर्लफ्रेंडसोबत रोमँटीक ट्रीपवर गेला होता मेहुल चोक्सी, Dominica मध्ये झाली अटक – अँटीग्वा पंतप्रधानांची माहिती

मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदी हे दोघेही १३ हजार ५०० कोटींचा चुना पंजाब नॅशनल बँकेला लावून भारताबाहेर पळाले आहेत. नीरव मोदीला लंडनमध्ये शिक्षा झाली आहे तो लंडनच्या तुरुंगात आहे. तर मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला असला तरीही काही कायदेशीर पूर्तता बाकी आहेत. या दोघांनाही भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करतं आहे. मेहुल चोक्सी जेव्हा पकडला गेला तेव्हा त्याची कथित गर्लफ्रेंड बार्बरा त्याच्यासोबत होती.

ADVERTISEMENT

EXCLUSIVE: असा दिसतो मेहुल चोक्सी, डोमिनिकाच्या जेलमधील फोटो आला समोर

ADVERTISEMENT

बार्बरा ही माझी गर्लफ्रेंड आहे असा दावा मेहुल चोक्सीने केला होता. तसंच तिच्यावर आरोपही करण्यात आले आहेत. त्यानंतर आता इंडिया टुडेशी बोलताना बार्बराने अनेक खुलासे केले आहेत. मी मेहुलची चांगली मैत्रीण होते. त्याने मला त्याची ओळख राज अशी करून दिली होती. मेहुलने मला गिफ्ट म्हणून डायमंड रिंग आणि ब्रेसलेट दिले होते पण ते खोटे निघाले असंही बार्बराने सांगितलं होतं. दरम्यान मेहुल चोक्सीने बार्बरावरही काही आरोप केले होते.

मेहुल चोक्सीने बार्बरावर काय आरोप केले?

मेहुल चोक्सीला डोमनिका पोलिसांनी मागच्या वर्षी मे महिन्यात अटक केली. त्यानंतर त्याने जामीन मिळावा म्हणून अर्ज केला. तसंच मेहुलने आपण दोषी नसल्याचंही म्हटलं होतं. बार्बराविषयी तो म्हणाला की, बार्बरा माझ्या शेजारी राहात होती आम्ही दोघे वॉकला जात होतो असंही सांगितलं. २३ मे २०२१ रोजी मला बार्बराने एके ठिकाणी बोलावलं होतं तिथे मी तिला घ्यायला जायचं होतं. मात्र मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा तिथे साधारण १० लोक जमले होते. त्यांनी मला मारहाण केली. त्यावेळी बार्बराने मला वाचवण्याचा जराही प्रयत्न केला नाही. तिने माझं अपहरण केलं असंही आपल्या तक्रारीत मेहुल चोक्सीने म्हटलं आहे. मात्र बार्बराने हे सगळे आरोप फेटाळले होते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT