छोटा राजनला एम्समध्ये बेड मिळाला, सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला आहे. ज्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करून संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. तिहारच्या जेलमध्ये छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे हा शिक्षा भोगतो आहे. त्याला कोरोना झाल्यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 26 एप्रिलला ही माहिती […]
ADVERTISEMENT
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता त्याला दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला आहे. ज्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर मीम्स शेअर करून संताप व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. तिहारच्या जेलमध्ये छोटा राजन उर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे हा शिक्षा भोगतो आहे. त्याला कोरोना झाल्यानंतर दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 26 एप्रिलला ही माहिती तिहारच्या तुरुंग अधिकाऱ्यांनी सेशन्स कोर्टात दिली. ज्यानंतर सोशल मीडियावर छोटा राजनवर मीम्स फिरू लागले आहेत.
ADVERTISEMENT
जागतिक कीर्तीचे गुंड 'मादरणीय' छोटा राजन जी यांना दिल्लीच्या तुरुंगात कोरोना झाल्यामुळे तातडीने दिल्लीत केंद्र सरकारच्या…
Posted by Swapnil Ghiya on Tuesday, April 27, 2021
सामान्य माणसांना कोरोना झाल्यावर बेड मिळत नाही मग छोटा राजनला बेड कसा मिळतो? असा प्रश्न काही नेटकरी विचारत आहेत. शिव अरूर या ट्विटर युजरनेही छोटा राजनचा फोटो शेअर करत छोटा राजन को बेड मिल गया एम्समें… असं लिहिलं आहे. या ट्विटला अनेक लोकांनी उत्तरं दिली आहेत. एक नेटकरी म्हणतो इथे सामान्य माणसांना बेड मिळत नाही, डॉनला थेट एम्समध्ये बेड? बरं झालं असतं की आपणही डॉनच असतो.
छोटा राजन को एम्स मे फट से बेड मिल गया
ओर तुम बोल रहे हो अस्पतालों में बेड नहीं है?
Posted by Zaky Khan on Tuesday, April 27, 2021
गज़ब हाल है देश का, शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्रा जहाँ बेड की तलाश में भटकते परलोक सिधार जाते हैं। वहीं माफिया छोटा राजन को संक्रमण की रिपोर्ट पर ही सीधे एम्स में बेड मिल जाता है।
Posted by Indra Mani Upadhyay on Tuesday, April 27, 2021
देशातली सामान्य जनता रस्त्यावर मरत असताना दहशतवाद्यांना आपण जावयांसारखं का वागवत आहोत? आपल्या देशाची बिकट याच कारणामुळे आहे कारण आपण गुंडांना सेलिब्रिटी मानतो. ‘आपल्या देशाचं दुर्दैव आहे की छोटा राजन आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग एकाच रूग्णालयात आहेत.’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देत लोकांनी मीम्स शेअर केले आहेत. एका नेटकऱ्याने तर हेही म्हटलं आहे की ‘पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलाकार राजन मिश्रा यांचा बेड न मिळाल्याने मृत्यू होतो आणि दुसरीकडे छोटा राजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येताच त्याला एम्स रूग्णालयात बेड मिळतो. देशातल्या या परिस्थितीवर नेमकं काय म्हणावं?’
हे वाचलं का?
छोटा राजनवर 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पत्रकार जे.डे. हत्या प्रकरणात त्याला आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. अशात छोटा राजनलाही कोरोना झाला. त्याला बेड मिळाल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT