तोतया PSI अधिकाऱ्याला पोलिसांनी केली अटक, लग्नासाठी मुलीला इम्प्रेस करायला केला होता खटाटोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आतापर्यंत बनावट पोलीस अधिकारी बनून गुन्हा करणाऱ्या अनेकांच्या बातम्या आपण वाचल्या असतील. परंतू पंढरपूरमध्ये एका तरुणाने लग्नासाठी मुलीला इम्प्रेस करण्यासाठी आपण PSI असल्याचं भासवलं. इतकच नव्हे तर योजना आखत या तरुणाने तरुणीच्या घरच्यांसोबत ओळख वाढवत लग्नाची मागणीही घातली. परंतू मुलीने सतर्कता दाखवल्यामुळे या तोतया PSI चं बिंग अखेरीस फुटलं. पंढरपूर पोलिसांनी मंगळवेढा येथील रमेश भोसले या तरुणाला अटक केली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी या आरोपीकडून बनावट पोलीस ओळखपत्र, खेळण्यातली रिव्हॉल्वर आणि पोलिसांचा युनिफॉर्म जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर शहरातील एक तरुणी पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होती. यावेळी रमेश भोसलेने तिच्याशी ओळख वाढवत आपण मंगळवेढा पोलीस ठाण्यात PSI म्हणून कार्यरत असून आपले वडील IPS अधिकारी असल्याचं सांगितलं. यानंतर झालेल्या ओळखीतून रमेशने तरुणीच्या आई-वडीलांशी ओळख काढून त्यांच्याशी जवळीक साधली.

दरम्यानच्या काळात पीडित तरुणीची रमेश भोसलेसोबत मैत्री वाढल्यानंतर त्याने तिच्याजवळ लग्नासाठी विचारणा केली. इतकच नव्हे तर रमेश भोसले तरुणीच्या पालकांनाही लग्नाची मागणी घातली. यावेळी तरुणीला संशय आल्यामुळे तिने मंगळवेढा पोलीस ठाण्यात चौकशी केली असता रमेश भोसले नावाचा कोणताही अधिकारी तिकडे कार्यरत नसल्याचं तिला समजलं. यानंतर तरुणीने पंढरपूरातील निर्भया पथकाला या घटनेबाबतची माहिती दिली. ज्यानंतर पोलिसांनी सापळा रचत तोतया PSI अधिकारी रमेश भोसलेला अटक केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT