रावणाच्या लंकेतच सोनं प्रचंड महाग, एका तोळ्यासाठी मोजावे लागत आहेत लाखो रूपये

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लंकेत सोन्याच्या वीटा! ही मराठी म्हण प्रसिद्ध आहे. तसंच रावणाची लंका सोन्याची होती असेही पुराणातले उल्लेख आपण ऐकून आहोत. अशात आता याच लंकेत सोन्याच्या भावांनी आस्मान गाठलंय. एक तोळा सोनं म्हणजे प्रति दहा ग्रॅम सोन्यासाठी हजारांमध्ये नाही तर लाखांमध्ये पैसे मोजावे लागत आहेत. भारतात सोन्याचे दर ४८ हजार ते ५० हजार प्रति तोळा आहेत. मात्र श्रीलंकेत हे भाव गगनाला भिडले आहेत. मागच्या काही दिवसांपासून श्रीलंकेतली आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. श्रीलंका सरकारने आणीबाणीचीची घोषणा केली आहे.

ADVERTISEMENT

श्रीलंकेतली परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की रोजच्या लागणाऱ्या वस्तूंसाठीही लोकांना संघर्ष करावा लागतो आहे. एकीकडे अन्न-धान्यासह जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत. तर दुसरीकडे सोन्याचे भाव नुसते कडाडलेले नाहीत तर ते गगनाला भिडले आहेत.

हे वाचलं का?

श्रीलंकेत एक तोळा सोन्यासाठी २ लाख ३७ हजार रूपये मोजावे लागत आहेत. सोमवारी ११ एप्रिलला सोन्याचा दर २ लाख ३७ हजार प्रति तोळा इतका होता. सोन्याचे दर इतके कडालेले असल्याने सराफ बाजारांमधली गर्दीही ओसरल्यात जमा आहे.

श्रीलंकेत मागच्या ७५ वर्षांमधली सर्वात मोठी आर्थिक मंदी आली आहे. त्यामुळे श्रीलंकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. शनिवारी काही भागांमध्ये कर्फ्यूही लावण्यात आला. तसंच परिस्थितीवर नियंत्रण मिळावं म्हणून श्रीलंकचे जवानही रस्त्यावर उतरल्याचं दिसून येतं आहे.

ADVERTISEMENT

उद्ध्वस्त युक्रेन! लाखो लोक बेघरं; कीव्ह, खार्किव्हमध्ये प्रचंड विध्वंस, १० दिवसांत काय घडलं?

ADVERTISEMENT

का ढासळली आहे श्रीलंकेची अर्थव्यवस्था?

कोव्हिडचा मोठा परिणाम श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेवर झाल्याचं पाहण्यास मिळतं आहे. त्यामुळे श्रीलंकेवर इतर देशांकडून कर्ज गेण्याची वेळ आली. हे कर्ज वाढत गेलं. ज्या प्रमाणात कर्ज घेतलं त्या प्रमाणात उत्पन्न वाढलं नाही याचा मोठा फटका श्रीलंकेला बसला आहे. विदेशी कर्ज १७० टक्क्यांपेक्षा जास्त वाढलं त्यामुळेच श्रीलंकेत ७५ वर्षातली मोठी मंदी आली आहे.

शेती क्षेत्राबाबत श्रीलंका सरकारने जे निर्णय घेतले ते शेतीचा घात करणारे ठरले. श्रीलंका सरकारने घोषणा केली होती की पूर्णतः सेंद्रीय शेती केली जाईल. त्यामुळे श्रीलंकेत किटकनाशकं आणि रासायनिक खतं यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र ज्या पर्यायी साधनांचा वापर केला गेला ती साधनं चीनमधली होती. त्याचा अत्यंत वाईट परिणाम शेतीवर झाला त्यामुळे शेती क्षेत्र तोट्यात गेलं. आता सोन्याचे भावही आकाशाला भिडले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT