प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित विरोधात ईडीकडून चार्जशीट दाखल
प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले विरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. ARA प्रॉपर्टीज आणि इतर दोन जमिनींच्या प्रकरणात ही चार्जशीट ईडीने दाखल केली आहे. अविनाश भोसले यांचं ABIL हे मुख्यालय सरकारी आणि कमिशन ऑफिसर्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे. ही जमीन ईडीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती. २६ जुलैला काय […]
ADVERTISEMENT

प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले विरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. ARA प्रॉपर्टीज आणि इतर दोन जमिनींच्या प्रकरणात ही चार्जशीट ईडीने दाखल केली आहे. अविनाश भोसले यांचं ABIL हे मुख्यालय सरकारी आणि कमिशन ऑफिसर्स यांच्यासाठी राखीव असलेल्या जागेवर आहे. ही जमीन ईडीने मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात जप्त केली होती.
२६ जुलैला काय घडलं?
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) सोमवारी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांच्यासह व्यावसायिक सत्येन टंडन यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली. येस बँक डीएचएफएलमध्ये (DHFL) ३,७०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ही चार्जशीट दाखल करण्यात आली. अविनाश भोसले हे महाराष्ट्रातील अनेक राजकारण्याच्या जवळचे व्यक्ती आहेत. या घोटाळ्याप्रकरणी सुरवातीला सीबीआयने त्यांना अटक केली होती त्यांनतर त्यांची ईडीने चौकशी केली. चौकशी दरम्यान त्यांना ईडीने अटकही केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत, अशात आता त्यांच्या मुलाविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली आहे.
येस बँक-DHFL घोटाळा नक्की प्रकरण काय आहे?
येस बँक DHFL ची केस मार्च 2020 मध्ये CBI ने नोंदवली होती. त्यानंतर सीबीआय आणि ED ने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर आणि DHFL चे तत्कालीन प्रोमोटर्स कपिल आणि धीरज वाधवन यांच्या घरावर छापे टाकले. या प्रकरणी राणा कपूर आणि कपिल वाधवन यांना अटक करण्यात आली होती. सीबीआय तपास सुरू करणार होती पण तोपर्यंत कोविड-१९ मुळे लॉकडाऊन जाहीर झाला. ईडीने २०२० मध्ये रेडियस ग्रुपच्या संजय छाब्रियांसह येस बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेल्या अनेक लोकांचे जबाब नोंदवले होते. सीबीआयने नंतर जून २०२० पर्यंत या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला आणि राणा कपूर तसेच इतरांना ताब्यात घेतले.
या प्रकरणात अविनाश भोसलेंचा काय रोल?
या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने भोसले यांना मे महिन्यात अटक केली होती. त्याआधी एप्रिल महिन्यात सीबीआयने या प्रकरणी भोसले, शाहिद बलवा आणि इतरांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकले होते. अविनाश भोसले यांनी येस बँकेकडून डीएचएफएलला कोट्यवधींचे कर्ज देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्यात त्यांना कमिशन स्वरुपात काही रक्कम मिळणार होती असा आरोप भोसलेंवरती आहे.