मुंबईत सात कोटींच्या बनावट नोटा जप्त, पोलिसांनी केला टोळीचा पर्दाफाश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत सात कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. बनावट नोटा छापून वितरित करण्याच्या उद्देशाने आलेल्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीकडून सात कोटी रूपये, वेगवेगळ्या कंपन्याचे सात मोबाईल, एक लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत. मुंबईतल्या दहीसर भागात ही कारवाई करण्यात आली.

ADVERTISEMENT

मुंबईत बनावट नोटा दैनंदिन व्यवहारात आणल्या जाणार आहेत याची माहिती पोलिसांना त्यांच्या खबऱ्यांतर्फे मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी याबाबतची माहिती त्यांच्या नेटवर्कमधून काढली. ज्यानंतर हे समजलं की चार व्यक्ती 2 हजार रूपयांच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी दहीसर या ठिकाणी येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी धाव घेतली. ज्या कारबाबत माहिती मिळाली होती त्या कारची पोलिसांनी झडती घेतली. ज्यामध्ये 2 हजार रूपयांच्या 25 हजार नोटा पोलिसांना आढळल्या.

हे वाचलं का?

पोलिसांनी कारवाई करून आरोपींची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी सात कंपन्यांचे मोबाईल, एक लॅपटॉप, आधार कार्ड, पॅनकार्ड, गाडी चालवण्याचा परवाना, निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आणि 28 हजारांची रोख रक्कम जप्त केली आहे.

या सगळ्या नोटा सात कोटींच्या आहेत. आम्ही दहीसर चेक नाक्यावर ही कार पकडली आहे. हे सगळेजण अंधेरीहून येणार असल्याचं समजलं होतं. त्यामुळे आम्ही त्याप्रमाणे आमची पथकं तैनात केली होती. एक पथक बोरिवली येथील नॅशनल पार्क या ठिकाणी होतं आणि दुसरं पथक दहीसर चेकनाका या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी आम्ही ही कार पकडली आणि कारवाई केली असंही पोलिसांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आत्तापर्यंत आम्ही सात जणांना ताब्यात घेतलं आहे. या नोटा मध्यम प्रतिच्या आहेत मात्र त्या बाजारात चलनात आल्या तर कुणालाही लक्षात येणार नाहीत अशा आहेत. या नोटा घेऊन आरोपी दिल्लीहून आले होते. त्यांना या नोटांचं काय करायचं होतं? यामागे आणखी कोण कोण आहेत? त्यांनी या नोटा कशा छापल्या या सगळ्याची माहिती आम्ही घेत आहोत असंही पोलिसांनी स्पष्ट केलं. युनिट ११ चे तपास अधिकारी विनायक चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT