कोरोना महामारीचं संकट टळू दे ! तुळजाभवानीच्या चरणी शेतकऱ्याने अर्पण केले १०१ किलो आंबे
सध्या संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारच्या यंत्रणा वारंवार प्रयत्न करत आहेत. तर राज्यातली जनताही हे महामारीचं संकट टळू दे यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. तुळजापूर येथील एका शेतकऱ्याने तुळजाभवानीच्या चरणी १०१ किलो केसर आंबे अर्पण करत राज्यावरचं हे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना […]
ADVERTISEMENT
सध्या संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारच्या यंत्रणा वारंवार प्रयत्न करत आहेत. तर राज्यातली जनताही हे महामारीचं संकट टळू दे यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. तुळजापूर येथील एका शेतकऱ्याने तुळजाभवानीच्या चरणी १०१ किलो केसर आंबे अर्पण करत राज्यावरचं हे संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना केली आहे.
ADVERTISEMENT
धाराशिव साखर कारखान्यात राज्यातला पहिला ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट
तुळजापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी धनंजय पाटील यांनी आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीने केशर आंब्याची बाग लावली होती. आपल्या बागेमधून धनंजय पाटील यांना १६ टन आंब्याचं उत्पन्न मिळालं. मुंबईतील एका व्यापाऱ्याच्या माध्यमातून पाटील आपलं उत्पन्न इंग्लंडला एक्सपोर्ट करणार आहेत. त्याआधी राज्यातली सध्याची परिस्थिती पाहता, तुळजाभवानीच्या चरणी आपल्या शेतातील आंब्याचं पिक अर्पण करत धनंजय पाटील यांनी कोरोना महामारीमधून राज्याची लवकर सुटका होऊ दे असं साकडं घातलं.
हे वाचलं का?
दरम्यान महाराष्ट्रात काल दिवसभरात 67 हजार 160 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. तर दिवसभरात 676 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर 1.51 टक्के इतका झाला आहे. तर दिवसभरात राज्यात 63 हजार 818 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 34 लाख 68 हजार 610 कोरोना रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 82.2 इतका झाला आहे.
ADVERTISEMENT
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 54 लाख 60 हजार 8 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 42 लाख 28 हजार 836 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात 41 लाख 87 हजार 675 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 246 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 6 लाख 94 हजार 480 सक्रिय रूग्ण आहेत.
ADVERTISEMENT
भारतात मे महिन्यात रोज पाच हजारांपेक्षा जास्त Corona मृत्यू होणार IHME चा अहवाल
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT