WhatsApp स्टेटसवर कमेंट केल्याने गोळीबार, चाकूचे वार, नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?
योगेश पांडे, नागपूर: WhatsApp वर स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या वादात नागपूरमध्ये लग्नाच्या वरातीत गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहमद रफिक चौकातील आहे. या विचित्र घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं. नेमकी घटना काय? शाहबाज खान नावाच्या व्यक्तीने WhatsApp वर आरोपी समीरचा फोटो असलेल्या स्टेटसवर काही […]
ADVERTISEMENT
योगेश पांडे, नागपूर: WhatsApp वर स्टेटस ठेवण्यावरून झालेल्या वादात नागपूरमध्ये लग्नाच्या वरातीत गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना नागपूरच्या यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहमद रफिक चौकातील आहे. या विचित्र घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं होतं.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
शाहबाज खान नावाच्या व्यक्तीने WhatsApp वर आरोपी समीरचा फोटो असलेल्या स्टेटसवर काही तरी कमेंट केली होती. त्यावर समीर हा प्रचंड नाराज झाला होता. यानंतर वैतागलेल्या समीरने शहाबाजला फोन केला. यावेळी शहाबाज समीरला म्हणाला की, ‘मै यहा का बादशाह हूँ और अभी बारात में हूँ’, असं म्हणत त्याने फोनच कट केला. त्यामुळे चिडलेला समीर आपल्या साथीदारांसह थेट शाहबाज असलेल्या लग्नाच्या वरातीतच पोहचला.
हे वाचलं का?
यावेळी समीर थेट हवेत गोळीबार करून वरातच थांबवली. झालेला प्रकार हा धक्कादायक असल्याने शहाबाजने तिथून तात्काळ पळ काढला. दुसरीकडे वरात का थांबवली? अशी विचारणा करण्यासाठी नवरदेवाचा भाऊ पुढे सरसावला. पण त्याचवेळी आरोपीने थेट आपल्याजवळील चाकूने वार करत त्याला जखमी केले. त्यानंतर थोड्या वेळात आरोपीने देखील तेथून पळ काढला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलिसांनी अवघ्या काही तासातच चार आरोपींना अटक केली आहे.
मुलीने ठेवलेल्या WhatsApp स्टेट्समुळे आईला गमवावा लागला जीव
ADVERTISEMENT
मुलीने ठेवलेल्या WhatsApp स्टेट्समुळे आईला गमवावा लागला जीव
ADVERTISEMENT
दरम्यान काही दिवसांपूर्वीच पालघरमध्ये WhatsApp वर स्टेट्समुळेच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.
एका कॉलेजवयीन मुलीने WhatsApp वर स्टेट्सच्या ठेवल्याच्या वादातून पालघरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. ज्यामध्ये मुलीच्या 48 वर्षीय आईचा मृत्यू झाला होता. बोईसरमधील शिवाजीनगर येथे ही घटना घडली होती. ज्याप्रकरणी पोलिसात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोन गटामध्ये झालेल्या हाणामारीत लीलावती देवी प्रसाद या 48 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला होता.
नेमकं प्रकरण काय?
प्रीती प्रसाद नावाच्या एका मुलीने WhatsApp वर काही स्टेटस ठेवले होते. ज्यावरुन दुसऱ्या मुलीला त्याचा प्रचंड राग आला. तिने त्याबाबत काही मुलांना सांगितलं. ज्यानंतर दोन तरुणांनी प्रीती प्रसादला गाठून तिच्यासोबत वाद घातला. त्यामुळे प्रीतीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. पण संबंधित तरुणांवर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी त्यांना सोडून दिल्याचा दावा प्रीतीने केला होता.
दरम्यान, यानंतर त्याच दोन तरुणांसह तब्बल 7-8 जण हे थेट प्रीती राहत असलेल्या बोईसरमधील शिवाजीनगर येथील नवीन वस्तीमध्ये गेले. जिथे सुरुवातीला त्यांच्यात प्रचंड भांडण झालं आणि त्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. यावेळी सर्वांनी प्रीतीच्या आईला आणि तिच्या कुटुंबातील इतरांना बेदम मारहाण केली होती.
या सगळ्या मारहाणीमुळे प्रीतीची आई लीलावती देवी ही गंभीररित्या जखमी झाली. त्यामुळे तिला तात्काळ तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT