जुळून आल्या रेशीमगाठी ! समाजाची बंधनं झुगारत नागपूरच्या तरुणींचा लग्नाचा निर्णय

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– योगेश पांडे, नागपूर प्रतिनिधी

समलैंगिक संबंध हा विषय भारतासारख्या रुढी परंपरांचा पगडा असलेल्या देशात अजुनही खुलेपणाने चर्चेला घेतला जात नाही. परंतू काही वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासीक निर्णय देताना देशात समलैंगिक संबंधांना मान्यता दिल्यानंतर देशात अनेक महत्वाचे बदल होत आहे. LGBTQ समुदायातील लोकं खुलेपणाने समोर येऊन आपली मत मांडायला लागली असून त्यांच्या प्रश्नाकडे बघण्याच्या दृष्टीकोनातही हळुहळु बदल होताना दिसतो आहे. महाराष्ट्राची उप-राजधानी नागपूरमध्ये असाच एक आश्वासक बदल घडला असून, शहरातल्या दोन महिलांनी आपलं प्रेम पुढे घेऊन जात विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर शहरातलं हे पहिलं समलैंगिक लग्न ठरणार असून डॉ. सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी या जोडप्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच परिवाराच्या उपस्थितीत या दोघींचाही साक्षगंध सोहळा पार पडला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डॉ. सुरभी ही नागपुरातील एका खासगी रुग्णालयात कार्यरत असून पारोमिता मुखर्जी ही कॉर्पोरेट क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर काम करते. समलैंगिक संबंधांना आता सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली असली तरीही समाजात या लोकांकडे खुल्या दिलाने पाहिलं जात नाही. परंतू या सर्व गोष्टींचा विचार न करता पारोमिता आणि सुरभी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. यानिमीत्ताने मुंबई तक ने दोघींशीही संवाद साधत त्यांची झालेली ओळख आणि एकत्र प्रवासात आलेल्या अडचणी जाणून घेतल्या.

ADVERTISEMENT

अशी झाली दोघींची पहिली भेट –

ADVERTISEMENT

गेल्यावर्षी डॉक्टर सुरभी मित्रा या एका सेमिनार मध्ये सहभागी होण्यासाठी कलकत्ता येथे गेल्या होत्या. त्यावेळी पारोमिता मुखर्जी या देखील त्या सेमिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या. सेमिनार मध्ये डॉ सुरभी यांचे मनोगत ऐकून पारोमिता फारच प्रभावित झाल्या. खऱ्या अर्थाने या दोघींच्या लव्ह स्टोरीला येथूनच सुरुवात झाली. पहिल्या भेटीतच दोघींमध्ये मैत्री झाली, पुढे मैत्री आणखी घट्ट होत गेली असता त्या एकमेकींच्या आवडी-निवडी जपायला लागल्या होत्या. लॉकडाऊनच्या काळात फोन आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातून होणारे संभाषण वाढतच गेले. दररोज एकमेकीं व्हिडिओ कॉल केल्याशिवाय त्यांचा दिवसच मावळत नसे. त्यानंतर मात्र दोघींना प्रत्यक्षात भेटीची ओढ लागली होती. ठरल्याप्रमाणे भेट सुद्धा झाली, त्यावेळी त्यांनी एकमेकींसमोर समलैंगिक लग्नाचा प्रस्ताव ठेवला.

सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना मान्यता दिली असली तरीही समलैंगिक विवाहाला अद्याप मान्यता मिळाली नाही. त्यामुळे या दोघींनाही आपल्या पुढील आयुष्यात मार्गावर असलेल्या अडथळ्यांची जाणीव आहे. परंतू समाजातल्या विरोधाला न जुमानता या दोघींनीही कायदेशीर पद्धतीने प्रयत्न करायचं ठरवलं आहे. कायद्याच्या भाषेत समलैंगिक संबध असलेल्या व्यक्ती एकत्र राहण्याला सिवील युनियन असं संबोधलं जातं.

डॉ. सुरभी आणि पारोमिता यांनी आतापर्यंतच्या प्रवासात घेतलेल्या त्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. भविष्यातही या दोघींनीही समलैंगिक संबंधांना समाज सहजरित्या स्विकारेल अशाच ठिकाणी स्थायिक होण्याचा विचार केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT