शिवसेनेच्या पंचायत समिती माजी सभापती 9 दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांनी फिर्यादी पतीला घेतलं ताब्यात

मुंबई तक

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या मागील नऊ दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचं लक्ष्य पती सुकांत सावंत यांच्याकडे वळविलं असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी मिर्या येथील सुकांत सावंत यांच्या घराची झडती घेण्यात आली. तर डॉग स्कॉडमार्फत घरासह नजीकच्या समुद्र किनारा परिसरात सर्च घेण्यात आला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत स्वप्नाली सावंत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत या मागील नऊ दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचं लक्ष्य पती सुकांत सावंत यांच्याकडे वळविलं असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. शुक्रवारी मिर्या येथील सुकांत सावंत यांच्या घराची झडती घेण्यात आली. तर डॉग स्कॉडमार्फत घरासह नजीकच्या समुद्र किनारा परिसरात सर्च घेण्यात आला. परंतु सायंकाळी उशिरापर्यंत स्वप्नाली सावंत यांचा शोध लागलेला नव्हता.

पतीच्या चौकशीने उलटसुलट चर्चांना उधाण

पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शुक्रवारी दुपारपर्यंत त्यांनी स्वप्नाली सावंत यांच्या घर परिसराची पाहणी केली. मात्र आठ दिवसानंतरही स्वप्नाली सावंत सापडलेल्या नसल्याने त्या बेपत्ता झाल्या की घातपात झाला या दृष्टीने पोलीसांनी तपासाला सुरुवात केली आहे. स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांचा शोध सुरू असतानाच आता पोलिसांनी त्यांचे पती सुकांत सावंत यांनाच चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू आहे.

9 दिवस उलटले तरी शोध लागत नाही