सख्खा मित्र झाला पक्का वैरी! १०० रूपयांसाठी पाईपने गळा आवळून मित्राला संपवलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– शिवशंकर तिवारी, मुंबई प्रतिनिधी

ADVERTISEMENT

आतापर्यंत आपण मैत्रीचे अनेक किस्से ऐकले असतील. अनेकदा मित्र आपल्या जवळच्या मित्रासाठी जीव देण्याच्याही आणाभाका घेतात. परंतू मुंबईच्या दहीसर भागात एका मित्राने फक्त १०० रुपयांसाठी आपल्या जिवलग मित्राचा खून केला आहे. यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने त्याने मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न केला. मृतदेह जाळल्यानंतर आरोपीने पोलिसांना फोन करुन आपल्या मित्राची जळालेली डेड बॉडी सापडल्याचंही सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, दहीसर पोलिसांची टीम ५ फेब्रुवारीला दहीसर पूर्व भागातील रमानी कंपाऊंडमधील गॅरेजमध्ये पोहचली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असता, त्यांना मृतदेह सापडल्याची माहिती देणारा व्यक्तीच खुनी असल्याचं कळलं. यानंतर पोलिसांनी आरोपी परमेश्वर कोकाटेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.

हे वाचलं का?

बुलढाणा : रात्री डी.जे. सुरु ठेवण्यासाठी पोलिसांचा मज्जाव, नागरिकांचा पोलीस ठाण्यात धुडगूस

या घटनेत हत्या झालेल्या दुसऱ्या मित्राचं नाव राजू पाटील असं आहे. पोलीस चौकशीत परमेश्वरने तात्काळ आपला गुन्हा मान्य केला. दोन्ही मित्र एकत्र दारु पिण्यासाठी बसले असताना त्यांच्यात १०० रुपयांच्या देवाण-घेवाणीवरुन वादाला सुरुवात झाली. हा वाद नंतर इतका विकोपाला गेला की परमेश्वरने पाईपने गळा आवळून राजूची हत्या केली. यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपीने राजूचा मृतदेह एका चादरीमध्ये गुंडाळून तो पेटवून दिला.

ADVERTISEMENT

आपल्यावर संशय जाऊ नये म्हणून परमेश्वरने सुरुवातीला पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचं नाटकही केलं. परंतू पोलिसी खाक्यासमोर त्याचा निभाव लागू शकला नाही. परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या माहितीनुसार परमेश्वर आणि राजू हे घनिष्ठ मित्र होते. अनेकदा ते एकत्र जेवत-खात असतं. परंतू राजूने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या १०० रुपयांवरुन दोघांमध्ये वाद झाला आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं.

ADVERTISEMENT

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत पिता-पुत्राचा मृत्यू, परिवारावर दुःखाचा डोंगर

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT